Chickpea Crop Management: राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यामध्ये विदर्भ मराठवाड्यातील लातूर, नांदेड, बीड, यवतमाळ, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामुळे पिकांवर विशेषत: रब्बी पिकांवर अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. त्यातील हरभरा हे पीक राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जात असून तेही या अवकाळी पावसापासून वाचलेले नाही. परंतु योग्य नियोजनामुळे आणि कीडरोगांच्या नियंत्रणामुळे शेतकरी हरभऱ्याचे रक्षण करु शकतात. .हरभरा भिजल्यावर...काही भागात अवकाळी पावसाने शेतात पूर्ण पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधी पाण्याचा निचरा करुन घ्यावा. परंतु अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असली तरी पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसात हरभऱ्याचे पीक भिजले असेल तरीसुद्धा शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये. .Mango Cloudy Weather: ढगाळ हवामानात आंबा मोहोराची काळजी कशी घ्यावी?.याशिवाय पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज त्यांनी घ्यावा. सध्या ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी भिजलेले हरभऱ्याचे पीक तसेच शेतात ठेवावे. पिकाला २ ते ३ दिवस चांगले ऊन मिळाल्यावर शेतकऱ्यांनी त्याची काढणी करावी, असा सल्ला महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नंदकुमार कुटे यांनी दिला..सुरक्षित साठवणपिकाची काढणी करुन त्याला वाळवावे, आणि दाण्यातील आर्द्रता १० ते १२ टक्क्यांपर्यंत आणावी. म्हणजे हरभऱ्याचे पीक चांगले टणक होईपर्यंत ते वाळवावे. त्यानंतर वाळलेल्या पिकाची मळणी करावी. हरभरा साठवून ठेवण्यासाठी त्यामध्ये केवळ ५ टक्के आर्द्रता असावी लागते. त्यासाठी त्याला चांगले ऊन देणे गरजेचे आहे. अशा प्रकारे पावसात भिजलेल्या हरभऱ्याला चांगल्या प्रकारे वाळवून त्याला साठवताना ५ टक्के कडुलिंबाला पाला घालावा..Avakali Paus: अवकाळी, ढगाळ हवामानात ज्वारी पिकाची काळजी कशी घ्यावी?.उशिरा पेरलेल्या हरभरावेळेवर पेरणी केलेला हरभरा सध्या काढणीच्या अवस्थेत आहे. परंतु उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकासाठी मात्र हे हा अवकाळी पाऊस लाभदायक ठरु शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये. कारण उशिरा पेरणी केलेला हरभरा हा घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असल्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यताही कमी आहे. तसेच हवामानाचा अंदाज घेत पीक काढणीला येताच लवकरात लवकर हरभऱ्याची काढणी करुन घ्यावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.