Heavy Rain : नांदेडला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा

Nanded Rain Update : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या दमदार पावसानंतर गुरुवारी (ता. २०) दुपारनंतर अनेक भागांत जोराचा पाऊस झाला.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या दमदार पावसानंतर गुरुवारी (ता. २०) दुपारनंतर अनेक भागांत जोराचा पाऊस झाला. या पावसाचे प्रमाण देगलूर, बिलोली, हिमायतनगर, हदगाव, धर्माबाद, मुखेड या तालुक्यांत सर्वाधिक पाऊस पडला. यामुळे या सहा तालुक्यांसह तब्बल ३६ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ६४.८० मिलिमीटर पाऊस झाला. दोन मंडलांत दोनशे मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सलग अतिवृष्टी झालेल्या भागात रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर खरिपातील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सूत्राने दिली.

Heavy Rain
Kolhapur Rain Update : कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाचा जोर

नांदेड जिल्ह्यात दीड महिन्यानंतर समाधानकारक पावसाने हजेरी लावली. मंगळवारी जिल्ह्यात सर्वच भागांत पाऊस झाला होता. या पावसामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले होते. यानंतर एक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी दुपारनंतर जोरदार हजेरी लावली.

या पावसाचे प्रमाण मोठे असल्याने अनेक तालुक्यांत रस्ते वाहतूक प्रभावित झाले. बिलोली, किनवट, हदगाव, देगलूर व धर्माबाद या तालुक्यांत नद्यांना पूर आल्याने वाहतूक बंद झाली आहे. तसेच मुखेड तालुक्यात एक पाझर तलाव फुटला आहे.

Heavy Rain
Maharashtra Rain Update : कोकण, मराठवाड्यात कोसळधारा

बिलोली तालुक्यातील येसगी पुलावरून पाणी वाहू लागल्याने हैदराबादकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अनेक गावांतील घरांत पाणी शिरल्याने गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पूरस्थितीचा आढावा घेऊन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी स्त: मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ६४.८० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३२७.३० मिलिमीटर नुसार वार्षिक सरासरीच्या ३६.७१ टक्के पाऊस झाला आहे.

अतिवृष्टी झालेले मंडळ...

बिलोली ८४.५०, लोहगाव ७३.५०, रामतीर्थ ७८.२५, सगरोळी १२१.५०, कुंडलवाडी ८४.२५, आदमपूर २१३.७५, येवती १४१.२५, जाहूर १४१.२५, बार्‍हाळी ९६, आंबुलगा १२२.७५, हदगाव ११६, तळणी ८२.५०, मनाठा ८४.५०, तामसा ८३.५०, पिंपरखेड ११६.२५, आष्टी ९६.५०, मोघाळी ७८.२५,

किनी ७७.७५, देगलूर १६२.२५, खानापूर १६४, मरखेल ११३.५०, माळेगाव १२५.२५, शाहापूर १८१.५०, हाणेगाव ११२.५०, नरंगल बुद्रुक २१०.७५, बोधडी ७८.५०, इस्लापूर १३१.५०, जलधारा १०१.५०, शिवणी ११२.५०, हिमायतनगर १०५.५०, जवळगाव १०५.५०, सरसम १०५.५०, धर्माबाद ८५.७५, जारीकोट ८४.२५, सिरजखोड ८५.७५, नरसी ७३.५०,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com