Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : नांदेड जिल्ह्यातील ३६, हिंगोलीतील ३ मंडलांत अतिवृष्टी

Nanded Monsoon Update : मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी (ता. २०) पावसाने दणका दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील तब्बल ३६ तर हिंगोली जिल्ह्यातील ३ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे.

Team Agrowon

Nanded News : मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी (ता. २०) पावसाने दणका दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील तब्बल ३६ तर हिंगोली जिल्ह्यातील ३ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. सर्व ८२ मंडलांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस झाला. तसेच परभणी जिल्ह्यात सर्व ५२ मंडलांत अत्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात ३६ मंडलांतील सर्वाधिक फटका मुखेड तालुक्याला बसला आहे. त्यापाठोपाठ देगलूर, बिलोली, हिमायतनगर, हदगाव, धर्माबाद, मुखेड या तालुक्यांत सर्वाधिक पाऊस पडला. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ६४.८० मिलिमीटर पाऊस झाला. दोन मंडलांत दोनशे मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

त्याचबरोबर यात आदमपूर (ता. बिलोली) मंडलात २१३.७५, तर नरंगल बु. (ता. देगलूर) मंडलात २१० मिलिमीटर पाऊस झाल्याने या ठिकाणी ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पूरस्थितीचा आढावा घेऊन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी स्त: मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडलांत शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ९४.५ मिलिमीटर, वसमत तालुक्यातील टेंभुर्णी ७८.८ मिलिमीटर,

औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव ८५.८ मिलिमीटर या तीन मंडलांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३२.७ मिमी, जुलै महिन्यात आजवर २३१.९ मिलिमीटर तर १ जूनपासून एकूण सरासरी २७७ मिलिमीटर (८५.२ टक्के) पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT