Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Konkan Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस

Team Agrowon

Pune News : गेली पाच ते सहा दिवस राज्यातील विविध भागांत पावसाने दाणादाण उडवली. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस आहे.

तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. रविवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील साताऱ्यातील हेळवाक, मोरगिरी येथे १७७.५ मिलिमीटर पाऊस पडला. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने धरणातील आवक काही प्रमाणात कमी झाली आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यातच घाटमाथ्यावरही पावसाचा जोर अधिक आहे. ताम्हिणी घाटात २३० मिलिमीटर पाऊस पडला असून अंबोणे २१०, दावडी १९२, डुंगरवाडी १८७, कोयना पोफळी १५८, भिरा १४९, शिरगाव १७०, लोणावळा टाटा १२८, भिवपुरी १०४, वळवण १२३, खांड ११२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे कोकणातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खेडमधील जगबुडी नदीने पाणी पातळी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड शहर, अलसुरे, चिचघर, प्रभुवाडी ही गावे बाधित झाली आहेत. तर कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सूर्या, वाशिष्टी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे.

मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा भागात जोरदार पाऊस झाल्याने ओढे, नाले भरून वाहत आहेत. खानदेशातील नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडला.

पूर्व भागात पावसाच्या तुरळक सरी बरसत असल्या तरी अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. नगर, सोलापूर भागांत काही अंशी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेती कामांना वेग आला असून, भात लागवडी वेगाने सुरू झाल्या आहेत.

मराठवाड्यातील जवळपास सर्वच भागात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. या भागातील सिंदगी येथे ६४ मिलिमीटर तर माहूर ७७.५, सिरसम बु. ५६.३, माळहिवरा ४९, खंबाळा ४२.४ मिलिमीटर पाऊस पडला.

तर अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मागील दोन दिवसांपूर्वी नांदेड भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता या भागात पाऊस कमी झाला असल्याने नद्या, ओढ्याच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली आहे.

विदर्भात अकोला, यवतमाळ जिल्ह्यांत मागील दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडल्यानंतर आता पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळी काही प्रमाणात कमी झाली असून वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे.

१०० मिलिमीटरहून अधिक पडलेल्या पावसाची ठिकाणे : स्रोत - कृषी विभाग

पोयनाड १३२, चौल, रामरज १३२, पनवेल १०९.५, आटोने १३२.८, कसू १३२, करंजवडी १११.५, रोहा, नागोठणे १००.५, चानेरा १२०.३, कोलाड १०८.३, पोलादपूर, कोंडवी, वाकण १११.५, असुर्डे १०७.८, कळकवणे, शिरगांव १११, कडवी १२८.५, मुरडव १०१.५, माखजन १०२.५, फणसवणे १११.८, तेर्ये १११.८ नंदगाव ११४.३, बवरली १३२, धामणंद १०२.५.आबलोली १०४.५,

वहाळ १२४.५, मेंढा १४९.८, चिपळूण, खेर्डी १०२.५, साटवली १०३.३, विलवडे ११७.५, राजापूर ११४, सौंदळ १०६.५, जैतापूर १०३.३, कुंभवडे ११६.३, नाटे १०३.३, भांबेड ११७.५, पाचल १२५, आजगाव ११५.८, मदुरा १०९, कणकवली १२१.८, वैभववाडी ११५.५, येडगाव १०३, भुईबावडा ११५.५, भेडशी १०१, वागडे १२१.८, महाबळेश्‍वर १३९, गगनबावडा ११५.५, सिंगड १५१.३, कापशी १०२.८, बार्शीटाकळी १०६.५, दिग्रज १११.५, तिवरी ११६.८, वेल्हा १०८.५.

कोकण विभाग ः कल्याण ७२.८, धसई ९५.५, देहरी ६८.५, नयाहडी, सरळगाव ९५.५, उल्हासनगर, अंबरनाथ, गोरेगाव ६३.५, कुमभर्ली ५०, बदलापूर ६३.५, अलिबाग ९०, किहीम, सरल, चरी ९०, पवयंजे ८३.५, ओवले, कर्नाळा ८८.३, तलोजे ५०.८, मोराबी ८५, कर्जत ६२.८, नेरळ ८६, कडाव ७४.८, कळंब ७१.८, कशेले ७२, चौक ६२.८, वौशी ६३.३, पाली ७६.५, जांभूळपाडा ७३.५, पेण ७८.३,

वशी ६३.३, कामरली ६३.३, महाड ८१, बिरवडी ८०.५, नाटे ७१.५, खारवली ८०.५, तुडली ८१, माणगाव ७९.८, इंदापूर ९६.३, गोरेगाव ६६.८, लोणेरे ७४.३, निजामपूर ९७.५, मुरूड ९८.५, म्हसळा ७९, खामगाव ७३, तळा ८२.५, मार्गताम्हाणे ९१.५, रामपूर ७१.५, सावर्डे ८९.३, दाभोळ ९२.३, वाकवली ६७.३, खेड ६७.३, शिर्शी ९८.५, आंबवली, कुळवंडी ९७.५, भरणे ८४.८, दाभीळ ९८.५, गुहाघर ८२.३,

तळवली, पाटपन्हाळे ७०.३, हेदवी ९८.८, मंडणगड ७७.५, म्हाप्रळ ७४.३, देव्हारे ७०.८, खेडशी ८१.८, पावस ६०.३, जयगड ८४.५, कोतवडे ७४.३, मालगुंड ८२.३, टरवल ८६.३, पाली ६९, फुणगुस ८६.३, आंगवली ७५.३, कोंडगाव ८२.८, देवळे ७०.५, देवरूख ६६.५, तुळसानी ६५.८, माभळ ७६.५,

कोंडये ९१, ओणी ८९, लांजा ८८, पुनस ८८, मीतबंब ७१.७, शिरगाव ८२.८, पाटगाव ७९.३, श्रावण ७३, पोइप ७५.३, बांदा ७७.८, अंबोली ९८.८, वेंगुर्ला ८१.५, तर शिरोडा ८३.८, म्हापण ६३.८, नांदगाव ७८, तालेरे ९१, कडवल ८०.८, तालवट ९८.८, वसई, मांडवी, निर्मल, मानिकपूर ८४.८, अगशी ६४.८, झरी ७२.३.

मध्य महाराष्ट्र : उभेरठाणा, सुरगाणा ५२, इगतपुरी ५८.५, पेठ ५५.८, कोहोर ५५.८, चुलवड , दाब, खुंटामोडी ४२, रावेर ४१.८, खानापूर ५१, कुऱ्हा ४५, अमळनेर ४९.३, धानोरा ४२, साळवा ५४.८, माले ८२.३, मुठे ४३.८, कार्ला ९२.८, खडकाळा ४६.८, लोणावळा ९३.८, पानशेत ४७, आंबेगाव ५०.८, परळी ७३.८, बामणोली ५८, मरळी ५४.५, ढेबेवाडी ५२.८, तळमावले ५५.३, कुठरे ५२.८, कोळे ५५.३,

तापोळा, लामज ७०, चरण ६४.५, काळे ५९.३, पडळ ५२.३, बाजार ७९.८, कोतोली ५४, बांबवडे ५५, करंजफेन ७०.५, सरूड ५३.५, आंबा ८२.८, राधानगरी ६६.५, सरवडे ६३.३, कसबा ७३, आवळी ६३, राशिवडे ६०.८, कसबा ६५.५, साळवण ९५.३, सांगरूळ ५९.८, शिरोली-दुमाला ५१.८, कसबा बीड ५५.५,

बालिंगा ५१.३, हळदी ५२.३, सिद्धनेर्ली ५६, केनवडे ५२.८, बिद्री ६४.८, पिंपळगाव ६९.५, कूर ५९, कडेगाव ६२.८, कराडवाडी ६०.३, गवसे ९४, उत्तूर ५७.५, चंदगड ८५.८, नारंगवाडी ५६.३, तुर्केवाडी ५४.५, हेरे ८५.८.

विदर्भ : जळगाव ८८.३ जामोद ८०.८, वडशिंगी ५२.५, आसलगाव ६९.५, संग्रामपूर ९६.८, सोनाळा, बावनबीर ८१.८, पातुर्डा ४८.३, कवठळ ५२.५, मनसगाव ४८.३, चांदूरबिस्वा ४५, चोहोट्टा ६६.८, कुटासा ७०.८, हिवरखेड ४६, अडगाव ५२.३, पारस, व्याळा ९७.५, वाडेगाव ७५.५, उरळ, निंबा, हातरूण ९१,

आलेगाव ६०.५, चान्नी, सस्ती, अकोला ९१, घुसर ७३.३, दहिहांडा ७०.८, उगवा ६६.८, आगर ८६, बोरगावमंजू ७३.३, शिवणी ६८, पळसो, सांगळूद ७३.३, करणखेड ६७.८, महान ७३, राजंदा ९५, दाभा ५७, पिंजर, खेर्डा ७३, मूर्तिजापूर ५१, हदगाव ६६.८, जामठी ५२.५, शिरपूर ५४.८, मुंगळा, मेडशी ६०.५,

करंजी ५४.८, कवठळ ६७.८, इंझोरी १०५, कुपटी ९५.५, उमरी ९५.८, कारंजा ५२.५, पोहा ५९.५, मंगरूळ ५८, पापळ ५४.३, मांगकिन्ही ७८.५, लोही ९०.३, तूप टाकळी ७२.८, गुंज, कळी ९५.८, हिवरा ७७.५, कासोळा ९५.८.

मराठवाडा ः सिंदगी ६४, माहूर ७७.५, सिरसम बु. ५६.३, माळहिवरा ४९, खंबाळा ४२.४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Tax Refund : ...तर शेतकऱ्यांनाही कर परतावा मिळावा

Maharashtra Politics : ओठात एक पोटात एक, अशी भूमिका नाही : एकनाथ शिंदे

Krushi Sevak Issue : कृषी सेवक कालावधी रद्द करा

Raju Shetti : गुऱ्हाळे, खांडसरी उद्योग बंद पाडण्याचा घाट : शेट्टी

Business Permission : सहकारी संस्थांना १५१ प्रकारचे व्यवसाय करण्यास परवानगी

SCROLL FOR NEXT