Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : वैभववाडी, कणकवलीला मुसळधार पावसाने झोडपले

वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत गुरुवारी (ता. १३) विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल दीड तास विजांचा जोरदार कडकडाट सुरू होता.

टीम ॲग्रोवन

सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी आणि कणकवली तालुक्यांत गुरुवारी (ता. १३) विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने (Heavy Rain with Lightning) हजेरी लावली. तब्बल दीड तास विजांचा जोरदार (Heavy Rainfall) कडकडाट सुरू होता. जिल्ह्याच्या बहुतांश भागाला पावसाने झोडपून काढले. परतीच्या पावसाने भातपिकांचे नुकसान (Paddy Crop Damage) होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली.

जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी गुरुवारी परतीच्या पावसाने झोडपून काढले. वैभववाडीत दुपारी साडेतीनपासून विजांचा कडकडाट सुरू झाला. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळला.

तास-सव्वा तास विजांचा गडगडाट सुरू होता. विजा आणि मुसळधार पाऊस यामुळे रस्त्यावरील वाहतूकदेखील थांबली होती. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड तालुक्यांच्या काही भागांत मुसळधार पाऊस झाला.

कणकवली, वैभववाडीत दोन तास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे भातपिकाचे नुकसान होणार आहे. पावसामुळे काही भागांतील वीजपुरवठा सुमारे दोन तास खंडित झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT