Rain Agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर

Kolhapur Monsoon Update : पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांच्या आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Team Agrowon

Kolhapur Rain News : जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर पावसाने सुरवात केली. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांच्या आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे सकाळी ७ वाजता पंचगंगा नदीची पाणीपातळी ११ फूट ५ इंच होती.

हीच पाणीपातळी रात्री १० वाजता १२ फूट ११ इंचापर्यंत गेली आहे. तर इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे. राज्यात पुढील २४ ते ३६ तासांत मॉन्सून सक्रिय होईल, असे वातावरण निर्माण झाले असल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे.

जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, आजरा, पन्हाळा तालुका वगळता इतर ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. ज्या तालुक्यात पाऊस सुरू आहे, तोही पुरेसा नाही, असे चित्र आहे. काल दुपारी पश्‍चिम भागातून जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, भोगावती नदीकाठी असणाऱ्या गावांमध्येही जोरदार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली आहे. धरणातील पाणीसाठा कमी होऊ नये, यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णत: कमी केला आहे.

गगनबावडा तालुक्यातील घटप्रभा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, यातून ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाअभावी शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Panchayat Administration: मुदत संपलेल्या ५२५ ग्रामपंचायतींवर सरपंच बनले प्रशासक

Irrigation Scheme: कृषी सिंचन योजनेच्या कामांची पाहणी

Maharashtra Economic Growth: अर्थव्यवस्थेची झेप अर्ध्या ट्रिलियनपर्यंत

Village Irrigation Development: एकीच्या बळातून मिळविली सिंचन शाश्‍वती

IAS Ashima Mittal: जनगणनेची कामे विहित कालावधीत पूर्ण करा

SCROLL FOR NEXT