Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : नगर जिल्ह्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस

Latest Rain Update : जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस बरसू लागला आहे. गुरुवारी (ता. २१) रात्री जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस बरसू लागला आहे. गुरुवारी (ता. २१) रात्री जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे.

प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार, शुक्रवारी (ता. २२) सकाळी सहा वाजेपर्यंत पारनेर तालुक्यातील टाकळी, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी, कोळगाव; कर्जत तालुक्यातील मिरजगाव; शेवगाव तालुक्यातील शेवगाव, भातकुडगाव चापडगाव, बोधेगाव, एरंडगाव; पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, मिरी; नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सलाबतपूर, कुकाना; कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव येथे अतिवृष्टीची नोंद झाली.

जिल्ह्यात यंदा अजूनही पुरेसा पाऊस नव्हता. अकोले तालुक्यातील पश्‍चिम भाग वगळता अन्य भागांत चांगला पाऊस कुठेही नसल्यामुळे पाण्याची स्थिती गंभीर आहे. पुरेशा पावसाअभावी खरिपाची पिके ही वाया गेलेली आहेत.

गुरुवारी दुपारनंतर पावसाचे वातावरण तयार झाले. सायंकाळी शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी, पारनेर, नगर, राहुरी, कोपरगाव, राहता संगमनेर भागांत पावसाने हजेरी लावली. अकोले तालुक्याच्या पश्‍चिम भागातही पाऊस झाला. मात्र तेथील पावसाचे प्रमाण कमी होते. जिल्ह्याच्या अनेक भागांत पहिल्यांदाच चांगला पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले.

प्रशासनाकडील नोंदीनुसार सुमारे १६ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पुरेशा पावसाअभावी खरिपाची पिके पूर्णतः वाया गेलेली असली, तरी चांगला पाऊस झाल्यास रब्बी हंगाम चांगला होईल, अशी आशा आहे.

याशिवाय आतापर्यंत कोरडी असलेली धरणे, नदी, नाले, तलावातही पाणी साठवण होण्याची आशा आहे. खरिपातील अनेक पिके आता वाया गेलेली असली, तरी उशिराने पेरा झालेल्या पिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे.

महसूल मंडलनिहाय पाऊस

नालेगाव : २३, सावेडी :१८, कापूरवाडी : ३६, केडगाव : ३६, भिंगार : २६ नागापूर : ५१ जेऊर : ५३, चिचोंडी : २७ वाळकी : २५ चास : ३१ रुईछत्तीशी : २५ पारनेर : १८ भाळवणी : ३८ सुपा : ३७, वाडेगव्हाण : ४०, वडझिरे : २१, निघोज : २५, टाकळी : ६५, पळशी : २८, श्रीगोंदा : ६८, काष्टी ३२,मांडवगण ४६, बेलवंडी ७१, चिंबळा ३६, देवदैठण ३४, कोळगाव ११४, कर्जत २७, मिरजगाव ६५, माही ३१, आरगाव ३२, खर्डा २६, नान्नज ४७, नायगाव ४८, शेवगाव ७८, भातकुडगाव: ८८, चापडगाव ७६, बोधेगाव : ७५, ढोरजळगाव : ४५, एरंडगाव : ७०, पाथर्डी : ३० माणिकदौंडी : ४९,

टाकळी बागूल कोरडगाव ६५, करंजी ४१, मिरी ७४, नेवासा खुर्द ६५, नेवासा बुद्रूक : ११५, सलाबतपूर ८८, कुकाना ८८, चांदा : ४४, घोडेगाव : ४२, सोनई : ३६, वडाळा : ४२, राहुरी : ३०, देवळाली : ३०, सात्रळ: २७, टाकळीमिया : २०, ब्राह्मणी : ३६, वांबोरी : ४४, आश्‍वी : २२, शिबलापूर : २३, तळेगाव : ३२, समनापूर : ३३, घारगाव : २५, डोळासणे : २५, साकूर : २६, पिंपरणे : २२, कोपरगाव ७६, रवंदे : ४६, सुरेगाव : ४६ दहिगाव : ४७, पोहेगाव ; ३२, श्रीरामपूर : ३२ बेलापूर : २२, उंदीरगाव : २८, टाकळीभान : २३, राहता : २९ , शिर्डी : ३९ बाभळेश्‍वर : २९, लोणी : २९, पुणतांबा : ५५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture MSP: शनिवारपासून सोयाबीन, मूग, उडीद हमीभावाने खरेदी सुरू!

Weather Update: महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; उत्तरेकडील जिल्ह्यांत तापमान घसरले

Market Update: सोयाबीनचा दर टिकून, मुगावर दबाव कायम

Solar Pump Scheme: अठरा हजारांवर शेतकऱ्यांना सौरकृषिपंपाची प्रतीक्षा

Post Harvest Management: संत्रा फळाचे काढणीपश्चातचे नुकसान टाळण्यासाठी सोपे उपाय

SCROLL FOR NEXT