Kolhapur Rain Update agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Rain Update : पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, तब्बल ७ बंधारे पाण्याखाली

Kolhapur Weather : कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागासह पूर्व भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सात बंधारे पाण्याखाली गेले.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.

यामुळे जिल्ह्यातील पश्चिम भागासह पूर्व भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सात बंधारे पाण्याखाली गेले.

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा धरण क्षेत्रांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत पातळी सहा फुटांनी वाढली आहे. यामुळे पंचगंगेवरील राजाराम, शिंगणापूर, रूई (इचलकरंजी), सुर्वे, तेरवाड व शिरोळ, असे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याचबरोबर चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरण भरले.

मागच्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने (ता. ०६) रोजी पंचगंगेची पाणीपातळी बारा फुटांवर होती दरम्यान काल ती पाणी पातळी वाढून शुक्रवारी दुपारी १८ फुटांवर गेली आणि पंचगंगेचे पाणी राजाराम बंधाऱ्यावरून वाहू लागले. यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच बंधारा पंचगंगेच्या पाण्याखाली गेला.

पावसामुळे दुपारी राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणीपातळी १८ फुटांवर गेली. झालेल्या पावसाने कोल्हापूर शहरालगत असलेला राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली गेला.

पुराच्या या पाण्यातून दुपारी तीन वाजेपर्यंत वाहतूक सुरू होती. याबाबत शाहूपुरी पोलिसांना माहिती मिळताच बॅरिकेट लावून वाहतूक बंद केली. सायंकाळपर्यंत पाणीपातळीत फारशी वाढ झाली नव्हती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांचे 'रेल रोको आंदोलन' रद्द; न्यायालयात लेखी हमीपत्र सादर

Rabi Season: अमरावती जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर रब्बी हंगाम

Banana Cultivation: खतांचा समतोल वापर करून मिळवा केळीचे अधिक उत्पादन!

Ujani Dam Discharge: उजनी धरणातून शेतीसाठी यंदा तीन आवर्तने सोडणार

Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांची नासाडी

SCROLL FOR NEXT