Sericulture Farming: मुकुंद हिवाजी राठोड हा युवक संगणक अभियंता शिक्षण २०१६ साली पूर्ण करून सुमारे पंचवीस हजार मासिक वेतनावर २०१९ पर्यंत छत्रपती संभाजीनगर येथील एका कंपनीत काम करत असे. कोरोना आणि वडिलांच्या आजारपणामुळे त्याला जयराम नाईक तांडा या मूळ गावी यावे लागले. वडीलांचे निधन झाले आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळण्यासाठी गावी राहण्याचा निर्णय घेतला. त्यातून त्याने ग्रामविकासाला दिशा दिली. .वडिलांचे निधन झाल्याने मुकुंद राठोड याच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. अशा कठीण परिस्थितीत त्याने पारंपरिक स्थलांतरित मजुरीचा मार्ग न स्वीकारता रेशीम शेती हा पर्यायी आणि प्रयोगशील व्यवसाय स्वीकारला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला हा उपक्रम आता त्याच्या कुटुंबासाठी स्थिर उत्पन्नाचे साधन बनत आहे. या बदलामागे गावात २०२३ मध्ये झालेल्या पाणी संवर्धन आणि जलसंधारण कामांचा मोठा वाटा आहे..Business Success Story: जिद्दीतून सुनीता झाल्या आवळा प्रक्रिया उद्योजक.पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे तुती लागवड आणि रेशीम अळी संगोपनाला आवश्यक असलेली ओलावा स्थिती टिकून राहिली. त्यामुळे रेशीम उत्पादनात सातत्य आले आणि उत्पन्न तुलनेने स्थिर झाले. तथापि, अद्यापही उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याअभावी एक लॉट थांबवावा लागतो. जर वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध झाले, तर उत्पादन पूर्ण क्षमतेने घेता येईल आणि आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. आज मुकुंद आणि त्याची पत्नी दोघेही रेशीम शेती करतात. सध्या त्यांना मासिक सुमारे ७० ते ७५ हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाता सरासरी ६० हजार शिल्लक राहतात. .आज जयराम तांडा येथे सुमारे २५ शेतकरी रेशीम शेती करतात. गावात सुमारे ७५ एकरावर तुती लागवड झालेली आहे. ही कथा केवळ एका तरुणाची नाही, तर ग्रामीण भागात पाणी, स्थानिक रोजगार आणि कृषी-आधारित उद्योग यांचा परस्परसंबंध दाखवणारे उदाहरण आहे. पाणी उपलब्ध झाले, की शेती टिकते, शेती टिकली की स्थलांतर कमी होते आणि गावातच सन्मानाने रोजगार निर्माण होतो. रेशीम शेतीसारखे उद्योग ग्रामीण युवकांना शहरांवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक पातळीवर उद्योजकतेची नवी दिशा देऊ शकतात. केवळ उन्हाळ्याच्याअखेरीस पाण्याअभावी एक लॉट कमी घ्यावा लागतो. तो स्वतः सांगतो, की जर वर्षभर पाणी, मिळू शकते आणि ते मिळाले, तर गावातील तरुणांना बाहेर जावे लागणार नाही..बीड रेशीम कोष मार्केटबीड येथील रेशीम कोष बाजारपेठ ही आज मराठवाड्यातील उदयोन्मुख कृषी-आधारित बाजारपेठांपैकी एक म्हणून वेगाने पुढे येत आहे. पारंपरिक शेतीबरोबरच पूरक आणि नियमित उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम शेतीकडे बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी वळताना दिसत आहेत. विशेषतः दुष्काळ, अनियमित पाऊस आणि ऊस तोड मजुरीसाठी होणारे हंगामी स्थलांतर या समस्यांच्या पार्श्वभूमीवर रेशीम व्यवसाय ग्रामीण कुटुंबांना स्थानिक रोजगार आणि आर्थिक स्थैर्य देणारा पर्याय ठरत आहे..१९ मे २०२६ रोजी बीड रेशीम कोष बाजारात पांढऱ्या कोषाचे ४० लॉट आले होते. सुमारे २९११ किलो २०० ग्रॅम इतकी आवक नोंदविण्यात आली. या दिवशी कोषाला प्रति किलो किमान ५५० रुपये , कमाल ७६० रुपये आणि सरासरी ६९२ रुपये असा दर मिळाला. हे दर पाहता चांगल्या प्रतीच्या कोषाला बाजारात चांगली मागणी असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे बाजार समिती आणि रिलींग युनिट खरेदीदारांनी शेतकऱ्यांना डागी, डबल, पोचट किंवा खराब कोष वेगळे करून दर्जेदार माल स्वतंत्रपणे आणण्याचे आवाहन केले आहे. यामुळे उच्च प्रतीच्या कोषाला अधिक चांगला दर मिळण्यास मदत होत आहे..बीडमधील रेशीम कोष बाजारपेठ ही केवळ खरेदी-विक्रीची जागा नसून ग्रामीण भागातील आर्थिक परिवर्तनाचे एक महत्त्वाचे माध्यम बनत आहे. रेशीम व्यवसायामध्ये तुती लागवड, अळी संगोपन, कोष निर्मिती, वर्गीकरण आणि प्रक्रिया अशा अनेक टप्प्यांमध्ये स्थानिक रोजगार निर्माण होतो. महिलांचा सहभागही या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढत असून स्वयंसहाय्यता गटांसाठी हा उद्योग उत्पन्नाचे नवे साधन बनू शकतो. .Farming Success Stories: धडपड्या सासूबाईंच्या शास्त्रज्ञ- शेतकरी सूनबाई.कमी क्षेत्रात तुलनेने अधिक उत्पन्न मिळण्याची क्षमता असल्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्येही या व्यवसायाबद्दल आकर्षण वाढत आहे. तथापि, बाजारपेठेच्या पुढील विकासासाठी काही बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे. कोषांचे वैज्ञानिक ग्रेडिंग, शेतकरी प्रशिक्षण, स्थानिक रिलींग उद्योगांची वाढ, साठवण सुविधा आणि डिजिटल बाजार माहिती प्रणाली यांची आवश्यकता जाणवते. जर शासन, बाजार समिती, रेशीम विभाग आणि शेतकरी संघटना यांनी समन्वयाने प्रयत्न केले, तर बीड जिल्हा भविष्यात मराठवाड्यातील महत्त्वाचे ‘सिल्क क्लस्टर’ म्हणून विकसित होऊ शकतो..एकंदरीत, बीड रेशीम कोष मार्केट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे, स्थलांतर कमी करण्यास मदत करणारे आणि शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देणारे प्रभावी मॉडेल म्हणून पुढे येत आहे. योग्य दर्जा, संघटित बाजार व्यवस्था आणि स्थानिक प्रक्रिया उद्योग यांच्या मदतीने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडू शकते..रेशीम धोरण आणि जलसंधारणमहाराष्ट्रातील रेशीम धोरणाचे एक महत्त्वाचे वास्तव म्हणजे पाणी असेल तरच रेशीम शेती टिकते. तुती पिकासाठी नियमित ओलावा आवश्यक असल्याने तलाव पुनरुज्जीवन, ओढा खोलीकरण, भूजल पुनर्भरण या जलसंधारण कामांशी रेशीम शेतीचा थेट संबंध आहे. मराठवाड्यात अनेक गावांमध्ये जलसंधारणानंतर रेशीम शेती वाढू लागल्याची उदाहरणे दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात जलव्यवस्थापन आणि रेशीम धोरण यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक ठरत आहे. .देशाचे आणि राज्याचे रेशीम धोरण हे केवळ रेशीम उत्पादन वाढवण्यापुरते मर्यादित नाही, तर ग्रामीण रोजगार, महिला सक्षमीकरण, स्थलांतर कमी करणे आणि कृषी आधारित ग्रामीण उद्योग निर्माण करणे या व्यापक सामाजिक-आर्थिक उद्दिष्टांशी जोडलेले आहे. बीडसारख्या दुष्काळी भागात जलसंधारण आणि रेशीम शेती यांचा मेळ साधला, तर ग्रामीण भागात स्थिर उत्पन्न, स्थानिक रोजगार आणि आर्थिक परिवर्तन घडविण्याची मोठी क्षमता या क्षेत्रात आहे.- डॉ.सुमंत पांडे ९७६४००६६८३(माजी कार्यकारी संचालक,जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.