Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain : कापडणे, वडणे, निकुंभे परिसरात मुसळधार

Rain Update : धुळे तालुक्यात एकादशीला पावसाने जोरदार सलामी दिली. त्यानंतर पुन्हा पावसाने आठवडाभर दडी दिली.

Team Agrowon

Dhule News : धुळे तालुक्यात एकादशीला पावसाने जोरदार सलामी दिली. त्यानंतर पुन्हा पावसाने आठवडाभर दडी दिली. आता पुन्हा पावसाने पुनरागमन केले. आता तालुक्यात जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.

शुक्रवारी(ता.७) कापडणे, वडणे व निकुंभे परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने जमीन तृप्त झाली आहे. आता खऱ्या अर्थाने येत्या आठवडाभरात उर्वरित पेरण्या पूर्णत्वास येतील.

धुळे तालुक्यात एकादशीला पाऊस झाला. काही भाग कोरडाच होता. एक लाख सात हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी ४४ हजार ३९९ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या. केवळ ४१ टक्के पेरण्या झाल्या. आता पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी जोरदार कोसळला.

तब्बल एक महिना उशिरा पेरण्या

यंदा मृग कोरडा गेला. आता एकादशीलाच पाऊस पडेल, ही आशा खरी ठरली. एकादशीला बहुतेक भागात पाऊस झाला. तर उर्वरित भागात आज धो-धो कोसळला. आता उर्वरित ५६ टक्के पेरण्यांना वेग येणार आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी उशीर झाल्याने मका पेरणीस प्राधान्यदेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT