Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : उत्तर कोकण, पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

राज्याच्या विविध भागांत पाऊस थांबला आहे. शुक्रवारी (ता. २२) ढगाळ हवामानासह उकाड्यात वाढ झाली होती.

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात पावसाने (Rain Update) उघडीप दिली असली तरी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने (Rainfall) हजेरी लावली आहे. आज (ता. २३) कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rainfall Forecast) आहे. पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

राज्याच्या विविध भागांत पाऊस थांबला आहे. शुक्रवारी (ता. २२) ढगाळ हवामानासह उकाड्यात वाढ झाली होती. आज (ता. २३) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, उत्तर कोकणातील पालघरसह नाशिक, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्व विदर्भासह, पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकून त्याच्या सर्वसामान्य स्थितीमध्ये आहे. राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा दोन ते तीन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

नांदेड, हिंगोली, नागपूर.

राज्यात शुक्रवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पोलादपूर, माथेरान, कुडाळ, सुधागडपाली प्रत्येकी ३०, मुरूड, तळा, राजापूर, जव्हार, पेण, संगमेश्‍वर, महाड, खालापूर, माणगाव, शहापूर, मोखेडा, मुलदे प्रत्येकी २०.

महाराष्ट्र : लोणावळा, महाबळेश्‍वर ५०, इगतपुरी, राधानगरी प्रत्येकी ३०, नंदूरबार, गगनबावडा प्रत्येकी २०.

मराठवाडा : हिमायतनगर २०.

विदर्भ : गोंदिया, अर्जुनी मोरगाव, लाखंदूर, सालकेसा, सिरोंचा प्रत्येकी २०.

घाटमाथा : दावडी ६०, डुंगरवाडी, खोपोली, ताम्हिणी प्रत्येकी ५०, शिरगाव, वळवण प्रत्येकी ४०, कोयना (पोफळी), कोयना (नवजा), भिरा प्रत्येकी ३०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Management: पूरबाधित उसाचे व्यवस्थापन तंत्र

MSP Procurement: नांदेड जिल्ह्यात ३३ शासकीय खरेदी केंद्रांना मान्यता

Winter Season: मेळघाटाला भरली हुडहुडी

Farm Mechanization: मजूर, कापणीच्या संकटावर ‘सहकारा’तून मात

Grape Farming: बागेतील वातावरणानुसार निर्णय गरजेचे...

SCROLL FOR NEXT