नगर : मुळा पाणलोट क्षेत्रात (Mula Catchment Area) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असून, कुमशेत परिसरातील गावांचा व आठ वाड्यांचा संपर्क तुटला आहे. रस्ता फुटला, बांध फुटला, शेतांना ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान (Agriculture Land Damage) होत असताना कृषी विभागाकडून (Department Of Agriculture) दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
अकोले तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सतत अतिवृष्टी होत आहे. काल (बुधवारी) जोरदार पाऊस झाला. आंबीत येथील भातपिकांचेही नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा गळत असून, मुले थंडीने काकडली आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. अशा परिस्थितीत तालुका प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असून, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज आहे. आदिवासी भागात आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला असून, आरोग्य उपकेंद्रांत औषधांचा पुरवठा होणे आवश्यक आहे.
आश्रमशाळा सुरू झाल्या असून, मवेशी एकलव्य शाळेत एकाच हॉलमध्ये पाचशे विद्यार्थी राहत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हरिबा सावंत यांनी सांगितले. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी शेतीच्या कामात गुंतलेला आहे. अतिवृष्टीमुळे दुबार पेरणीचे संकट समोर दिसत असून, या संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे. कुमशेत येथील बंधारे ओव्हर-फ्लो झाले आहेत. अजूनही जोरदार पाऊस सुरूच आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फोफसंडी गावात आठ दिवसांपासून वीज गायब आहे.
भंडारदऱ्यातून विसर्ग
भंडारदरा, मुळा धरणाच्या वरच्या बाजूला पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे. भंडारदरा धरणा ८५ टक्के (साडेनऊ टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची होणारी आवक लक्षात घेऊन भंडारदरा धरणातून साडेतीन हजार क्युसेकने विसर्ग केला जात आहे. भंडारदरा धरणातील पाणी निळवंडे धरणात येते. निळवंडे धरणाचा साठाही ८२ टक्के झाला असून, धरणात पावणेसात टीएमसी पाणी आहे. त्यामुळे निळवंडेतून ५ हजार ३६७ क्युसेक, तर ओझर बंधाऱ्यातून पावणे सहा हजार क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू आहे. हे पाणी आता थेट जायकवाडीला जाऊन मिळत आहे. मुळाचा पाणीसाठाही ६० टक्क्यांवर गेला आहे. २६ टीएमसी क्षमतेच्या मुळात सव्वा सतरा टीएमसी जमा झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.