Summer Heat Agrowon
ताज्या बातम्या

Summer Heat : उन्हाच्या चटक्यांनी झळा वाढताहेत

सुर्य तापल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भात उन्हाची ताप अधिक असल्याने पारा ३८ अंशांवर पोचला आहे.

Team Agrowon

Weather Update पुणे : राज्याच्या कमाल तापमानात (Temperature) सातत्याने वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. परिणामी राज्यात उन्हाचा चटका आणि झळा (Heat) वाढत असून, उकाड्यातही वाढ होत आहे.

किमान तापमानातही वाढ झाल्याने गारठा (Cold Weather) नाहिसा झाला आहे, आज (ता. २८) कमाल व किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सुर्य तापल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भात उन्हाची ताप अधिक असल्याने पारा ३८ अंशांवर पोचला आहे. सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ३८.३ अंश तापमानाची नोंद झाली.

तर ब्रह्मपूरी, वाशिम येथेही तापमान ३८ अंशांच्या पुढे होते. कोकणातील रत्नागिरी येथे ३७.५ अंश, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, धुळे, विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या किमान तापमानात आता सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी (ता. २७) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे होता. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्रात पावसाचे संकेत

पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्यापासून (ता. १) जम्मु काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात विजा, गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे.

तर शनिवारपासून (ता. ४) दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि आग्नेय मध्य प्रदेशात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.३ (१२.४), जळगाव ३६.५ (११.३), धुळे ३७.०(११.०), कोल्हापूर ३४.७ (१९.५), महाबळेश्वर ३१.६ (१७.४), नाशिक ३५.४ (१३.५), निफाड ३५.६(९.५), सांगली ३६.० (१८.७), सातारा ३५.१ (१५.८),

सोलापूर ३७.० (२०.९), सांताक्रूझ ३५.२ (२०.०), डहाणू ३२.९ (१९.८), रत्नागिरी ३७.५ (२०.०), छत्रपती संभाजीनगर ३५.४ (१३.८), नांदेड - (१७.६), परभणी ३५.८(१७.४), अकोला ३८.३ (१६.०),

अमरावती ३६.६(१७.३), बुलढाणा ३६.०(१८.२), ब्रह्मपूरी ३८.२ (१७.४), चंद्रपूर ३७.० (१९.२), गडचिरोली ३३.८(१५.६), गोंदिया ३६.५ (१६.२), नागपूर ३५.८ (१७.०), वर्धा ३७.०(१८.६), वाशीम ३८.२ (१६.०), यवतमाळ ३६.० (१७.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Meat Quality Testing: मांस, पशुजन्य उत्पादन गुणवत्ता तपासणीची गरज

Agriculture Success Story: सामान्य शेतकरी ते प्रगतिशील, मार्गदर्शक शेतकरी

Vegetable Farming: भाजीपाला शेतीतूनच झाली मेथे कुटुंबाची उन्नती

Joyful Learning: आनंदाचा दिवस की आनंददायी शिक्षण

Urea Subsidy Formula: सूत्र बदलात सर्वांचेच हित

SCROLL FOR NEXT