Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : खानदेशात वाढली उष्णता

खानदेशात वाढली उष्णता

टीम ॲग्रोवन

जळगाव ः जोरदार पाऊस (Heavy Rain), अतिउष्णता (Heat) अशी स्थिती खानदेशात अनेक भागांत आहे. मागील काही दिवसांत उष्णता (Temperature) वाढली असून, कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर आहे. यामुळे केळीसह भाजीपाला पिकांच्या सिंचनाची (Irrigation) धावपळ सुरू आहे.

हलक्या, मध्यम जमिनीत लागलीच वाफसा झाला आहे. या क्षेत्रात भाजीपाला, केळी पिकाला सिंचन करण्याची गरज निर्माण झाली. उष्णतेमुळे पूर्वहंगामी कापूस पिकात कैऱ्या जोमात उमलत आहेत. कापसाचा दर्जाही सुधारत आहे. शेतकरी कोरड्या वातावरणाच्या प्रतिक्षेत होते. सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरण असते.

तर दुपारी मात्र ढगाळ, उष्ण वातावरण तयार होते. यामुळे शेतीकामे आवरताना अंगाची लाहीलाही होत आहे. सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिट होता. आता ऑक्टोबर सुरू झाल्याने पुन्हा काही दिवस उष्णतेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागेल, असे दिसत आहे. खानदेशात काही भाग, क्षेत्राचा अपवाद वगळता मागील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस झालेला नाही.

चांगला वाफसा व कोरडे दिवस गेल्याने कापूस वेचणी, फवारणी, आंतरमशागत, सोयाबीन मळणीची कामे सुरू आहेत. तसेच दादर ज्वारी, हरभरा पेरणीसाठी उडीद, मुगाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रातही पूर्वमशागत सुरू आहे. पण शेतीकामे सकाळी आठ ते ११ यादरम्यान बऱ्यापैकी वेगात सुरू असतात. दुपारी १२ नंतर ऊन व उकाडा, उष्णता, अशी स्थिती असते. यामुळे शेतीकामे संथ असतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT