Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा चटका

राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असली तरी कमाल आणि किमान तापमानातील चढ- उतार सुरूच आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच उत्तर महाराष्ट्रात पहाटे गारठा देखील कायम आहे.

Team Agrowon

Summer season Update पुणे : राज्यात उन्हाळ्याची चाहूल (Summer Season) लागली असली तरी कमाल आणि किमान तापमानातील (Minimum Temperature) चढ- उतार सुरूच आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका (Heat) वाढत असतानाच उत्तर महाराष्ट्रात पहाटे गारठा (Cold Weather) देखील कायम आहे. आज (ता. २४) कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

राज्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामान असले तरी स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात उन्हाची ताप वाढली आहे.

गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी ३८.५ अंश तापमानाची नोंद झाली.

तर विदर्भातील वाशीम, ब्रह्मपुरी, वर्धा, मराठवाड्यातील नांदेड आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या किमान तापमानात सातत्याने वाढ होत असतानाच गुरुवारी (ता. १३) उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ७ अंश सेल्सिअस, तर धुळे येथे ८.४ अंश आणि जळगाव येथे ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर उर्वरित राज्यात मात्र किमान तापमान १२ अंशांच्या पुढेच होतो. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

अकोला ३८.५, वाशीम ३७.८, ब्रह्मपुरी ३७.२, नांदेड ३७.२, वर्धा ३७.०, सोलापूर ३७.०, नागपूर ३६.८,जळगाव ३६.६, अमरावती ३६.४, चंद्रपूर ३६.४, सांगली ३६.३, यवतमाळ ३६.२, परभणी ३६.१, गोंदिया ३६.०.

गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.७ (१२.५), जळगाव ३६.६ (९.३), धुळे ३५.०(८.४), कोल्हापूर ३५.६ (१९.६), महाबळेश्वर ३१.६ (१७.०), नाशिक ३५.५ (१२.०), निफाड ३३.६(७.०), सांगली ३६.३ (१७.४), सातारा ३५.८ (१५.५),

सोलापूर ३७.० (१८.२), सांताक्रूझ ३१.७ (१८.४), डहाणू ३०.३ (१७.३), रत्नागिरी ३३.९ (१८.६), औरंगाबाद ३५.४ (१२.२), नांदेड ३७.२ (१६.८), परभणी ३६.१(१५.०), अकोला ३८.५ (१४.८), अमरावती ३६.४(१४.९), बुलडाणा ३४.४(१७.५),

ब्रह्मपुरी ३७.२ (१५.५), चंद्रपूर ३६.४ (१५.८), गडचिरोली ३३.४(१३.६), गोंदिया ३६.० (१४.६), नागपूर ३६.८ (१४.६), वर्धा ३७.०(१४.६), वाशीम ३७.८ (१५.०), यवतमाळ ३६.२ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT