Millet Diet
Millet Diet Agrowon
ताज्या बातम्या

Millet In Diet : आरोग्यवर्धक पौष्टिक तृणधान्ये काळाची गरज

Team Agrowon

Akola News : आरोग्यवर्धक, वातावरणपूरक तसेच कमी पाण्यात, कमी निविष्ठेमध्ये येणाऱ्या तसेच अन्नधान्य, पशुधन (Livestock), पर्यावरण तसेच आर्थिक सुरक्षा (Economic Security) देणाऱ्या भरडधान्याची (Millet) जगाला गरज असल्याचे मत कुलगुरू डॉ. शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांनी व्यक्त केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) ज्वारी संशोधन केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य २०२३ (Millet Year) च्या अनुषंगाने भरडधान्य पदार्थ (Millet Day) दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमासाठी कुलगुरू डॉ. गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर हे उपस्थित होते. डॉ. खर्चे म्हणाले, ‘‘जगामध्ये २० टक्के तृणधाण्याचा साठा एकट्या भारतातून उपलब्ध होतो, तसेच भारतातील भरडधान्य उत्पादन तसेच उत्पादकतेवर भविष्यात आरोग्यमय जीवन अवलंबून असणार आहे.’’

जागतिक पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यासाठी विविध भरडधान्य पदार्थाचे प्रदर्शन आयोजन करून आरोग्यवर्धनक जीवन पद्धतीकरिता पौष्टिक तृणधान्य सेवनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत विविध संशोधन केंद्राचे प्रमुख, अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. आर. बी. घोराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्रा. डॉ. गोपाल ठाकरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता डॉ. व्ही. व्ही. काळपांडे, डॉ. व्ही, यू. सोनाळकर, डॉ. अनिल गुल्हाने, श्री. वासुदेव गोदमले व श्री. उमेश राठोड यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : हळदीच्या भावातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद तसेच आल्याचे दर ?

Jowar Registration : ज्वारी विक्रीसाठी शासकीय केंद्रात अल्प नोंदणी

Agriculture Fertilizer : जळगावात मुबलक खतांसाठी कृषी विभागाची दमछाक

Mahabeej Workshop : कानशिवणी येथे ‘महाबीज’ची शेती कार्यशाळा

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT