Orange Agrowon
ताज्या बातम्या

Orange Harvesting : संत्रा बागांमध्ये फळे तोडणीला आला वेग

वाशीम जिल्हा फलोत्पादनात प्रामुख्याने संत्रा उत्पादनात आघाडीवर निघाला आहे. समृद्धी महामार्ग तसेच इतरत्रही रस्त्यांचे जाळे तयार झाले असल्याने वाहतुकीची समस्या मिटली आहे.

Team Agrowon

Orange Harvesting News वाशीम ः जिल्ह्यात संत्रा बागांची (Orange Orchard) संख्या वाढत चालली आहे. या फळ शेतीतून गेल्या काही वर्षांत शेतकरी चांगला पैसा मिळवू लागला आहे. यंदाच्या मृग बहराची काढणी (Orange Harvesting) सुरू झाली आहे.

बहुसंख्य बागांमध्ये सध्या फळे तोडणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. सध्या संत्र्याला क्रेटमागे ७०० रुपयांपर्यंत दर (Orange Rate) मिळत असल्याचे उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

वाशीम जिल्हा फलोत्पादनात प्रामुख्याने संत्रा उत्पादनात आघाडीवर निघाला आहे. समृद्धी महामार्ग तसेच इतरत्रही रस्त्यांचे जाळे तयार झाले असल्याने वाहतुकीची समस्या मिटली आहे.

हे पीक उत्पादनासाठी पोषक परिस्थिती तयार झाल्याने शेतकरी संत्रा लागवडीकडे वळाले. दरवर्षी हजारो रोपांची नव्याने लागवड केली जात आहे.

साधारणतः लागवडीनंतर चार ते पाच वर्षांनंतरच्या झाडांवर बहराचे नियोजन शेतकरी करतात. जिल्ह्यात मृग हाच प्रमुख बहर आहे. बहुतांश शेतकरी याच बहराचे नियोजन करून चांगले पैसे मिळवत आहेत.

मंगरूळपीर तालुक्यातील भुर येथील शेतकरी गोपाल देवळे यांनी आठ एकरांत लागवड केली. या क्षेत्रातून या वर्षी त्यांना सुमारे ३५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. आठ एकरांतील बागेत आतापर्यंत सुमारे ५ हजार क्रेट संत्र्यांचे उत्पादन निघाले आहेत.

या वर्षी बागेच्या व्यवस्थापनावर त्यांना ६ लाख ५० हजार रुपये खर्च आला आहे. खर्च वजा जाता बागेतून त्यांना सुमारे २७ लाखांचे घसघशीत उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरात भुर व वनोजा या परिसरात संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. गोपाल देवळे यांच्याकडे ३० एकर शेती असून, त्यापैकी २७ एकरांत त्यांची संत्रा बाग आहे.

या २७ एकरांपैकी आठ एकरांतील बागेतून बहर सुरू झाला आहे. गेल्या वर्षात त्यांना सुमारे २० लाखांपेक्षा अधिक उत्पादन आले होते.

बागा तोडण्याला सुरुवात

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मृग बहराची फळे तोडण्यास सुरुवात झाली आहे. व्यापाऱ्यांनी या बागांचे सौदे कुठे उभी बाग, कुठे क्रेट तर कुठे किलोच्या दराने केले आहेत. सौदे करताना ३३ टक्के रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना ॲडव्हान्स व उर्वरित रक्कम माल शेतातून बाहेर नेण्यापूर्वी द्यावी, अशा प्रकारच्या व्यवहाराची ही पद्धत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: शेतकरी संघटनांकडून संघर्ष समितीची स्थापना; शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन जाहीर

Delhi Kisan Mahapanchayat: दिल्लीच्या जंतरमंतरवर शेतकऱ्यांची महापंचायत; हमीभाव,अमेरिकेसोबतचा करार हे मुद्दे चर्चेत

Sugarcane SAP : शेतकऱ्यांची लूट थांबवा; उत्पादन खर्च आधारित ‘एसएपी’ सुरू करा

Soybean Market: सोयाबीन बाजारात चिंता; अमेरिकेच्या सोयाबीनची खरेदी चीनने थांबवली

Crop Damage Survey : महापुराचे पाणी शिरलेल्या सर्व शेतीचे पंचनामे करा

SCROLL FOR NEXT