Team Agrowon
कोळी किडीचा प्रादुर्भाव लवकर लक्षात न आल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांचा रंग बदलतो. वेळोवेळी बागेची निरिक्षणे करून वेळीच उपाय करावेत.
कोळी ही अष्टपाद वर्गातील कीड असून, अतिसूक्ष्म आकारामुळे सहजासहजी डोळ्याने दिसत नाही.
पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात ती अंडी घालते.
पिले व प्रौढ कोळी दिसायला सारखेच असले, तरी आकार लहान-मोठा असतो.
कोळी कीड पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडतात. त्यातून येणाऱ्या रस शोषतात. परिणामी, पानावर पांढुरके चट्टे पडतात.
जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो. फळावरील नुकसान तीव्र स्वरूपाचे असते. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते.