Grape Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Grape Crop Damage : कासेगावात सात हजार एकरांवरील द्राक्षे संकटात

सध्या सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच वादळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Pandharpur News ः सध्या सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष काढणीचा (Grape Harvesting) हंगाम सुरू झाला आहे. अशातच वादळी पावसाने (Heavy Rain) शेतकऱ्यांना मोठा दणका दिला आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील सुमारे सात हजार एकरावरील द्राक्ष शेतीला (Grape Crop Damage) फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात कासेगाव हे द्राक्षाचे आगार म्हणून ओळखले जाते. येथे जवळपास सात हजाराहून अधिक एकरावर द्राक्षाचे पीक घेतले जाते. यावर्षी येथील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष तयार केली आहे.

सध्या येथील द्राक्ष तोडणीच्या हंगामाला सुरवात झाली आहे. अशात दोन दिवसांपासून वादळी पाऊस, वादळवारे आणि ढगाळ हवामान अशी नैसर्गिक संकटाची मालिकाच सुरु झाली आहे.

गुरुवारी (ता. १६) रात्री कासेगावसह तालुक्यातील अनेक भागात वादळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे द्राक्षासह गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या बेदाणा शेडमध्ये अवकाळीचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. द्राक्ष घड्यात पाणी शिरल्याने द्राक्ष मनी फुटण्याची भीती निर्माण झाली आहे.

कासेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी पांडुरंग देशमुख यांची पाच ‌एकरावरील द्राक्षाची काढणी सुरु आहे. दरम्यान पावसामुळे द्राक्षे मनी कुजण्याची व फुटण्याची भीती निर्माण झाली आहे.

अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेतील फवारणीच्या खर्चातही वाढ झाली आहे. एकीकडे नैसर्गिक संकट आ वासून उभे असतानाच दुसरीकडे व्यापाऱ्यांनी ही संधी साधून खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

परिणामी बाजारातील द्राक्षाचे दर कोसळले आहेत. मागील आठ दिवसामध्ये प्रती किलो दहा ते १५ रुपयांनी दर कमी झाले आहे. सध्या प्रती चार किलोला ८० रुपये दराने खरेदी केली जात आहे. कमी दराने द्राक्ष विकली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

गतवर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नसल्याने द्राक्ष शेतात टाकून देण्याची वेळ आली होती. यंदाही वादळी पावसामुळे अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी नुकसानीची झळ पोचल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT