Grape Season Agrowon
ताज्या बातम्या

Grape Season : शेतकऱ्यांसाठी यंदाचा द्राक्ष हंगाम नाही गोड

Grape Market Rate : दर कमी; ५० हजार एकरांवरील काढणी बाकी

Team Agrowon

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः राज्यात यंदाच्या हंगामात अजूनही ५० हजार एकरांवरील द्राक्षाची काढणी (Grape Harvesting) शिल्लक आहे. मात्र, हंगामाच्या प्रारंभापासून द्राक्षाच्या दरात (Grape Rate) घसरण होत आहे.

परिणामी गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदाचा द्राक्ष हंगाम (Grape Season) फायद्यात नसल्याचे द्राक्ष उत्पादकांवरील शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

त्यामुळे यंदाचा द्राक्षाचा हंगाम शेतकऱ्यांना कडूच राहिला आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

राज्यात सुमारे पाच लाख एकरांवर द्राक्षाचे क्षेत्र आहे. यंदाच्या हंगामाच्या प्रारंभापासून नैसर्गिक संकट ओढवले. त्यामुळे एकाचवेळी द्राक्षाची फळ छाटणी शेतकऱ्यांना करावी लागली.

त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत द्राक्ष बागा साधल्या. एकंदर द्राक्षाचे सरासरी एकरी उत्पादन १० ते १२ टनांपेक्षा अधिक मिळते.

परंतु यंदाच्या हंगामात उत्पादनात दोन ते तीन टनांनी वाढ झाली असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाने सांगितले आहे.

फळ छाटणी घेतल्यानंतर सुमारे सव्वा चार महिन्यांत द्राक्ष काढणीला येतात. परंतु त्यानंतर बदलत्या वातावरणामुळे द्राक्षाची अपेक्षित फुगवण झाली नाही. मण्यांत गोडी उतरली नाही.

त्यातच द्राक्ष पिकास निसर्गाची साथ मिळाली नाही. परिणामी द्राक्ष काढणीचा कालावधी पावणे पाच महिन्यापर्यंत पोहोचला. त्यातूनही द्राक्ष काढणी सुरु झाली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपूर्वी वाढती थंडीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाची मागणी कमी झाली.

उठावही कमी होऊ लागला. त्यातच हंगाम सुरु झाला. त्यावेळी द्राक्षाची गोडी नव्हती. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी द्राक्ष काढणी करून बाजारपेठेत पाठविली. तसेच यंदा द्राक्षाच्या एकरी उत्पादनात वाढ झाली.

त्यामुळे मागणी कमी आणि पुरवठा जास्त यामुळे द्राक्षाचे दर कमी होण्याची कारणे संघाने सांगितली आहेत. या साऱ्याचा परिणाम द्राक्षाच्या दरावर झाला. हंगाम सुरु झाल्यापासून दोन ते तीन वेळा द्राक्षाच्या दरात घसरण झाली असल्याचे चित्र आहे.

राज्यातील नाशिक, सोलापूर आणि सांगली विभागांसह अन्य विभागांत सुमारे ५० हजार एकरांवरील द्राक्ष काढणी शिल्लक आहे. शेतकरी द्राक्ष काढणीसाठी लगबग करीत आहे. नाशिक आणि सांगली या दोन्ही विभागांतील द्राक्ष हंगाम एप्रिलअखेर संपेल.

तर सोलापूर विभागातील द्राक्षाचा हंगाम मे महिन्याच्या मध्यापर्यंत चालेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात द्राक्षाच्या दरात वाढ होणार का? असा प्रश्न द्राक्ष उत्पादकांना पडला आहे.

उत्पादन खर्चापेक्षा दर कमी
द्राक्ष बाग उभारणीचा खर्च पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत येतो. चालु वर्षाचा उत्पादन खर्च २० रुपये प्रतिकिलो आहे. यामध्ये उभारणीच्या खर्चाची विभागणी केली तर, उत्पादन खर्च प्रतिकिलोस २५ रुपयांच्या घरात पोहोचतो.

गेल्यावर्षी मार्च एप्रिलमध्ये देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षाला प्रतिकिलोस ३८ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत असा दर मिळाला.

तुलनेत यंदा मार्च, एप्रिलमध्ये द्राक्षाला प्रतिकिलोस १८ रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना नफाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे बागेचे अर्थकारण संकटात आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...
* अपेक्षित दर नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत
* दर नसल्याने बेदाणा निर्मितीकडे शेतकऱ्यांचा कल
* गेल्यावर्षीच्या तुलनेत १८ ते ३० रुपयांपर्यंत दरात घसरण
* येत्या हंगामासाठी रकमेची जुळवाजुळव करण्यात अडथळे

गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत यंदाचा द्राक्षाचा हंगाम फायदेशीर ठरला नाही. बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा अधिक होत आहे.

त्यामुळे द्राक्षाचे दर सातत्याने कमी होत आहे. उत्पादन खर्चही हाती पडला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आहे.
- शिवाजी पवार,अध्यक्ष,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT