Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Cold Weather : थंडीत कडाक्याने द्राक्ष उत्पादकांना फुटला घाम

गेल्या तीन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण असताना आता दुपारीही शीतलहरी कायम होत्या. निफाड येथील गहू संशोधन केंद्रावर थंडीतील सर्वात नीच्चांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

नाशिक : जिल्ह्यात शीतलहरी (Cold wave) असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असताना आता दुपारीही शीतलहरी कायम होत्या. निफाड येथील गहू संशोधन केंद्रावर थंडीतील सर्वात नीच्चांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे गहू (Wheat) हरभरा या पिकांना थंडी उपयुक्त असली तरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अडचणी वाढवणारी आहे.

शुक्रवारी (ता. ६) किमान तापमानात वाढ होऊन १५. ५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यानंतर शनिवारी (ता. ७) १३.५, रविवारी (ता. ८) १० तर सोमवारी (ता. ९) पारा ५ अंशावर घसरला आहे. सध्या सटाणा, कळवण, देवळा या तालुक्यांतील आगाप द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

तर दिंडोरी, निफाड, नाशिक, सिन्नर तालुक्यातील द्राक्षबागांचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही बागांमध्ये द्राक्ष साखर उतरण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे तापमानात घसरण होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शेकोट्या पेटल्या

थंडी अधिक असल्याने सोमवार (ता. ९) रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत घरातून बाहेर निघणे देखील अवघड झाले होते. त्यामुळे उबदार कपडे व ग्रामीण भागात शेकोटी पेटवली जात होती. थंडीमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात हलकी थंडी अनुभवायला मिळाली. मात्र मागील काही दिवसांपासून तापमानात चढ उतार सुरू आहे. हवेत गारवा असल्याने हुडहुडी भरली आहे.

थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका

थंडी वाढती राहिल्यास तयार झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा कडाक्याच्या थंडीत द्राक्षबागांमध्ये पहाटेच्या वेळी पाणी देणे, शेकोटी पेटवून धूर करणे असे उपाय द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत. द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT