Grape Agrowon
ताज्या बातम्या

Grape Pomegranate : टॅंकर, शेततळ्यांच्या साथीने फुलल्या द्राक्ष, डाळिंब बागा

ना म्हैसाळ योजनेचे पाणी ना तुबची बबलेश्वरचे पाणी, पण अशा परिस्थितीतही इथला शेतकरी गप्प बसला नाही. शेती पिकली तरच आपले आर्थिक चक्र सुरु राहील, या हेतूने द्राक्ष, डाळिंब पिकाकडे इथला शेतकरी वळला.

अभिजीत डाके

सांगली ः ना म्हैसाळ योजनेचे (Mhaisal Water Scheme) पाणी ना तुबची बबलेश्वरचे पाणी, पण अशा परिस्थितीतही इथला शेतकरी गप्प बसला नाही. शेती पिकली तरच आपले आर्थिक चक्र सुरु राहील, या हेतूने द्राक्ष (Grape), डाळिंब पिकाकडे (Pomegranate) इथला शेतकरी वळला. टॅंकरने पाणी घालून पिके जगवली. अर्थात शेतकऱ्यांनी कष्टाच्या जोरावर सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्र बागायती केले. कर्नाटकातील ‘तुबची बबलेश्वर’ आणि ‘म्हैसाळ’चे पाणी मिळाल्यास जत पूर्व भागातील ७२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना जत तालुक्यात पोहोचली आहे. पण ही योजना पश्चिम भागातून पुढे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यापर्यंत गेली. अर्थात तालुक्याच्या पूर्व भागात ही योजना नाहीच. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार का? सातत्याने पाणी द्या, अशी मागणी करूनही आजही पाणी नाही. परंतु रडत बसण्यापेक्षा शेती पिकवली तर, दोन पैसे हाती मिळतील आणि कुटुंबाचे आर्थिक चक्र सुरु राहील, अशी भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांनी मोर्चा वळविला.

दरम्यान, कर्नाटक सीमेजवळ, सोलापूर जिल्हातील मंगळवेढा तालुक्याजवळ पाणी आणता येईल, याचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला. त्यानुसार या भागातील शेतकरी टॅंकरचा वापर शेतीच्या पाण्यासाठी करू लागले. शेतात कुपनलिका घेऊ लागले. यामुळे काही प्रमाणात शेतीला पाण्याची सोय झाली. शेतीतून दोन पैसे हाती पडू लागले. पण पाणी देण्यासाठी सरकारची मानसिकता दिसत नाही. अशा परिस्थितीही शेतकऱ्यांनी पाण्यासाठीचा लढा सुरुच ठेवला आहे.

जत तालुक्याच्या पूर्व भागात पाणी देऊ, असे सांगितले होते. परंतु, आमच्या वाट्याचे पाणी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात का नेले? असा येथील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. (क्रमशः)

शेती हिरवीगार

कर्नाटकच्या तुबची-बबलेश्‍वर योजनेतून पाणी येते. या योजनेमुळे विजापूरचा संपूर्ण दुष्काळी पट्टा हिरवागार झाला आहे. तिकोंडी तलावातून पाणी नैसर्गिक उताराने ओढ्यातून भिवर्गी तलावापर्यंत येते. ओढे आणि पुढे बोर्गी नदीच्या दुतर्फा गावांचे शिवार भिजवत हे पाणी पुढे सोनलगीतून पुन्हा कर्नाटकातील चडचण हद्दीत जाते. त्यामुळे या भागातील शेती हिरवीगार दिसते.

पाणी टंचाई आहे. टँकरने पाणी देऊन आम्ही द्राक्ष शेती करीत आहोत. म्हैसाळ योजनेचे वर्षातून दोन आवर्तने आम्हाला पाणी मिळाले तर शाश्वत पाणी होईल. त्यामुळे आणखी बागायती क्षेत्र वाढेल.
रोहिदास सातपुते, उमदी, ता. जत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT