Grampanchyat Election
Grampanchyat Election Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchyat Election : उपसरपंचपदाचा मुहूर्त निघाला

Team Agrowon

अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील २५७ ग्रामपंचायतींची सरपंच व सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून, आता उपसरपंचपदाकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. उपसरपंचपदासाठी ९ ते १३ जानेवारी २०२३ या कालावधीत निवडणूक होणार असून, त्याबाबतचे वेळापत्रक जिल्हा निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

त्यामुळे नाही सरपंच तर उपसरपंचपदावर तरी वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १८ डिसेंबरला पार पडली. निवडून आलेले सरपंच व सदस्यांसाठी आयोजित प्रथम सभेत उपसरपंचांची निवड होणार आहे. सरपंचांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आलेला असल्याने चुरस चांगलीच वाढणार आहे. डोमक, बेलोना, वंडली, डवरगाव, सावंगी संगम, सांगवा, चिखली वैद्य या सात ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची निवड अविरोध झाली आहे.

तसेच ग्रामपंचात सर्फापूरमध्ये सरपंचपदासाठी अर्जच आला नसल्याने येथील सरपंचपद रिक्त आहे. त्यामुळे सर्फापूरमध्ये अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तेथे उपसरपंचाची निवड करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी गट ब श्रेणीच्या अधिकाऱ्याची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सरपंचांच्या अनुपस्थितीतच ही प्रक्रिया पार पाडणार आहे. विशेष म्हणजे उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या फेरीत सरपंचांना मतदानाचा अधिकार राहणार असून, समसमान मते पडल्यास सरपंचाला निर्णायक मत देता येईल.

उपसरपंचपदाची निवड होणाऱ्या ग्रामपंचायती
अमरावती : १२, भातकुली ११, तिवसा ८, चांदूररेल्वे १७, नांदगावखंडेश्‍वर १७, धामणगावरेल्वे ७, मोर्शी २४, वरूड २३, दर्यापूर २५, अंजनगावसुर्जी १३, अचलपूर २३, चांदूरबाजार २४, धारणी २३, चिखलदरा २६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

SCROLL FOR NEXT