Grampanchyat Election : मानोरा तालुक्यात नवीन वर्षात उपसरपंचपदाची निवडणूक

काही ठिकाणी ४ व ५ जानेवारी, तर काही ठिकाणी ६ जानेवारीला होणाऱ्या पहिल्या सभेत उपसरपंचपदाची निवड होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
Grampanchyat Election
Grampanchyat ElectionAgrowon

मानोरा, जि. वाशीम  : तालुक्यात झालेल्या ४१ ग्रामपंचायतीमध्ये (Grampanchyat) थेट सरपंचासह सदस्यत्वासाठी निवडणुकीनंतर आता उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. काही ठिकाणी ४ व ५ जानेवारी, तर काही ठिकाणी ६ जानेवारीला होणाऱ्या पहिल्या सभेत उपसरपंचपदाची (Upsarpanch) निवड होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.

Grampanchyat Election
Gram Panchayat Elections : भातकुली तालुक्यात निवडणूक रणधुमाळी

तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीपैकी एकच हातना ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यामुळे ४० ग्रॅम पंचायतीच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या. त्याचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर झाला. आता ४१ ग्रॅम पंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक निश्‍चित झाली. ४ जानेवारीला भुली, सिंगडोह, खापरदरी, अभयखेडा, रूई, हिवरा (खुर्द), माहुली, सावळी, देऊरवाडी,

एकलारा, जनुना (खुर्द), सोमाठाना, आसोला (खुर्द), तर ५ जानेवारीला आमदरी, साखरडोह, भिलडोंगर, देवठाणा, गोस्ता, मेंद्रा, पंचांळा, धावंडा, धानोरा (बुद्रुक), वापटा, चोंढी, सोमनाथनगर, पोहरादेवी, तोरनाळा, तर ६ जानेवारीला हातोली, रोहना, गिरडा, कारपा, खांबाळा, वटफळ, हातना, शेंदोणा, सोयजना, आमगव्हाण, भोयनी, वसंतनगर, रुद्राळा अशा ४१ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाची निवड होणार आहे.

Grampanchyat Election
Grampanchyat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी ठरली अव्वल

तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींमधून एका सरपंचासह ६८ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उपसरपंचपदाची निवड सभेत होणार असून हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. काही ठिकाणी सरपंच आणि विजयी झालेले सदस्य विरोधी गटाचे आहेत. सरपंच गटाकडून आपलाच उपसरपंच कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरपंच विरोधी गटातील सदस्यांना मात्र
किमान उपसरपंच तरी आपल्याच गटातील व्हावा, यासाठी सदस्यामधून प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com