Panchayat Raj Award Award
ताज्या बातम्या

Panachayat Raj Award : ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीला ग्रामऊर्जा स्वराज पंचायत पुरस्कार

ठिकेकरवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीला सोमवारी (ता. १७) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ग्रामऊर्जा स्वराज पंचायत या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

Team Agrowon

Pune News : ठिकेकरवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीला सोमवारी (ता. १७) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ग्रामऊर्जा स्वराज पंचायत (Panchayat Raj Award) या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सरपंच संतोष टिकेकर, ग्रामसेवक अस्लम शेख आणि जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरद माळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्रीय पंचायतराज व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार यंदाच्या या पुरस्कारासाठी ठिकेकरवाडी ग्रामपंचायतीची निवड झाली होती. केंद्र सरकारने नुकतीच या पुरस्काराची घोषणा केली होती.

त्यानंतर सोमवारी (ता. १७) नवी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरिराज सिंह, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, सचिव सुनीलकुमार आदी उपस्थित होते.

टिकेकरवाडी ग्रामपंचायतीने गावातच ओल्या कचऱ्यापासून गोबर गॅस निर्मिती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील सर्व कुटुंबांना गोबर गॅस उपलब्ध करून दिला जातो. तसेच, गावामध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून स्ट्रीट लाइट व ग्रामस्थांना गरम पाणी उपलब्ध करून दिले जाते.

यामुळे गाव व परिसरात पर्यावरणाचे रक्षण होत असल्याने केंद्र सरकारने ठिकेकरवाडीचा या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव केल्याचे सरंपच टिकेकर यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे गावाच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि विविध प्रकल्पांची उभारणी करण्यास आणखी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

या पुरस्कार वितरण समारंभासाठी माजी सरपंच प्रमोद टिकेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण टिकेकर, करंजामाता देवस्थानचे विश्‍वस्त निवृत्ती टिकेकर, माजी सदस्य मुकुंद टिकेकर आणि मुख्याध्यापक संतोष गडगे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI in Sugarcane Farming: सुरु उसाला एआयची जोड देऊन उत्पादन कसे वाढवता येईल?

PoCRA Phase 2: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्यासाठी १०० कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर

Indigenous Variety: आईच्या जपवणुकीला मुलाच्या प्रयोगाची साथ; गावरान वाणाची राष्ट्रीय नोंद

Rural Development: ‘बीडीओं’नी आठवड्यात १० गावांना भेटी द्याव्यात

Shivendrasinghraje Bhosale: वार्षिक योजनेतील निधी अखर्चित ठेवू नका

SCROLL FOR NEXT