Village Cleanliness Mission Agrowon
ताज्या बातम्या

Gram Swachhata Mission : ग्रामस्वच्छता अभियान आता नव्या रूपात

ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुधारणे व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य, केंद्र शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे.

Team Agrowon

वाशीम ः ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य (Health) सुधारणे व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य, केंद्र शासन वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुन्हा नव्या स्वरूपात राबविण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत आता जिल्ह्यात महिनाभर जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले यांनी दिली.

१९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ग्रामस्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत ३ ते १९ नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. गावागावांत स्वच्छतेच्या कामाला गती देण्यासाठी स्वच्छतेचा जागर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत आपले गाव कायम स्वच्छ ठेवण्यासाठी, तसेच ग्राम स्वच्छता अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी आणि वैयक्तिक शौचालयांचा वापर होण्यासाठी प्रत्येक गावात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले यांनी केले आहे.

प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला ६ लाख रुपयांचे बक्षीस

जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या गटाला ६० हजार रुपये, तर जिल्हास्तरावरील प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस ६ लाख, द्वितीय क्रमांकासाठी ४ लाख, तर तृतीय पुरस्कार ३ लाख रुपये मिळणार आहेत.

विभागस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या ग्रामपंचायतीला अनुक्रमे १२ लाख, ९ लाख, आणि ७ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच राज्यस्तरावर प्रथम बक्षीस ५० लाख रुपयांचे आहे. द्वितीय बक्षीस ३५ लाख व तृतीय बक्षीस ३० लाख रुपये देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त विशेष पुरस्कारही दिले जाणार आहेत.

...असे आहेत नवे बदल

यापूर्वी जिल्हा परिषद गटामधून प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला पूर्वी ५० हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येत होते. आता नवीन शासन निर्णयानुसार ६० हजार रुपये देण्यात येतील. या अगोदर जिल्हास्तरावर प्रथम ५ लाख, द्वितीय ३ लाख आणि तृतीय २ लाख रुपयांप्रमाणे पारितोषिक दिले जात होते. नवीन शासन निर्णयानुसार वरील तीनही पुरस्कारामध्ये प्रत्येकी एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT