Raju Shetti Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Death : शेतकऱ्यांच्या मृत्यूचे पाप शासनाला लागेल ः राजू शेट्टी

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना रात्रीची वीज मिळत असल्याने विजेचा शॉक लागून व साप चावून अपघाताने पंधराशे शेतकऱ्यांचा राज्यात मृत्यू झाला आहे.

टीम ॲग्रोवन

शिरपूर जैन, जि. वाशीम ः शेतकऱ्यांना दिवसा वीज (Agriculture Electricity) मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना रात्रीची वीज मिळत असल्याने विजेचा शॉक लागून व साप चावून (Snake Bite Farmer) अपघाताने पंधराशे शेतकऱ्यांचा राज्यात मृत्यू झाला आहे. त्याचे पाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात हा मेळावा झाला. या वेळी हजारोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या मेळाव्यात ते बोलत होते. शेट्टी पुढे म्हणाले, ‘‘धरणे शेतकऱ्यांच्या जमिनीवर आहेत. धरणांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामधून निर्माण होणाऱ्या विजेवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे.

मात्र विजेचे वाटप होताना शिल्लक राहिलेली वीज रात्री बारा वाजता शेतकऱ्यांच्या माथी मारली जाते व शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. यावर न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागणार आहोत. शासन दरबारी आकांक्षित जिल्हा म्हणून वाशीमची नोंद आहे. या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही आकांक्षित झाले आहेत काय,’’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अतिवृष्टीनंतर शासनाच्या अहवालामध्ये वाशीम जिल्ह्यामध्ये एक गुंठाही जमीन खरडून गेली नसल्याचे नमूद आहे. महसूल खात्याने घरात बसून सर्व्हे केला आहे. नवीन सरकार येऊन अडीच महिने झाले तरीही पालकमंत्री नेमलेले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांना जाब कुणी विचारावा, असा प्रश्‍न आहे.

गेल्या चार वर्षांपासून विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत तर शेतकरी कंगाल झाला आहे. हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतमाल विकत घेता येणार नाही असा कायदा करण्यासाठी सहा ते आठ ऑक्टोबरला दिल्ली येथे अधिवेशन होणार आहे.’’ प्रास्ताविक दामोदर इंगोले यांनी केले. मयूर बोर्डे यांनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT