Crop Damage : खानदेशात अतिवृष्टीने पीकहानी वाढू लागली

खानदेशात मागील तीन दिवस पाऊस सुरूच आहे. काही भागांत जोरदार, सुसाट वारा, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. जळगाव, नंदुरबार व धुळ्यातील सुमारे १८ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

जळगाव ः खानदेशात मागील तीन दिवस पाऊस (Rain Update Khandesh) सुरूच आहे. काही भागांत जोरदार, सुसाट वारा, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rainfall) सुरू आहे. जळगाव, नंदुरबार व धुळ्यातील सुमारे १८ महसूल मंडलांत अतिवृष्टी (Heavy Rain) झाली आहे.

Crop Damage
Crop Damage : साताऱ्यात अतिवृष्टीचा २५० हेक्टरवरील पिकांना फटका

अतिवृष्टीने पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस, उडीद, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस सुरूच असल्याने रोज हे नुकसान वाढत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण मागील चार दिवसांपासून नाही. सकाळपासून ढगाळ व पावसाळी वातावरण असते. काही भागांत संततधार सुरूच असते. यामुळे काळ्या कसदार जमिनीत कापूस पिकाची हानी वाढत आहे. तसेच उडीद पीकदेखील हातचे जाईल, अशी स्थिती आहे.

Crop Damage
Crop Damage : सततच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत

तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी शक्य

खानदेशात रविवारी (ता. ११) सोमवारी (ता. १२) आणि मंगळवारी (ता. १३) जोरदार पाऊस झाला आहे. पावसाने कापूस, केळी, मका, लिंबू बागांचेही नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने जळगावातील ७६६ हेक्टरवरील केळी, कापूस, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळ्यातही सुमारे एक हजार हेक्टर आणि नंदुरबारातही सुमारे १४०० हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील नुकसान वाढल्याची भीती आहे. कारण सोमवारी व मंगळवारीदेखील जोरदार पाऊस झाला. जळगाव, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, पाचोरा तालुक्यांत नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने मंत्रालयात पाठविला आहे. यात २२ गावे बाधित असून, एक हजार ३३६ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

अतिजोरदार पाऊस

भोकर (ता. जळगाव) धानोरा व अडावद (ता. चोपडा) या महसूल मंडलांत ९० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मुक्ताईनगरमधील अंतुर्ली, रावेरातील ऐनपूर, रावेर सावदा खिर्डी, जळगावमधील पिंप्राळा या महसूल मंडलांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. धुळ्यातही साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, अक्कलकुवा, धडगाव भागातही अतिवृष्टी झाली आहे.

मन्याड प्रकल्प भरला

चाळीसगावमधील मन्याड प्रकल्पदेखील या पावसात भरला आहे. बुधवारी (त. १४) सकाळी सहा वाजता हा प्रकल्प भरला. त्याच्या सांडव्यातून पाणी थेट गिरणा नदीत जात आहे. गिरणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गिरणा नदीला पूरस्थिती तयार होऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com