Cashew Processing Agrowon
ताज्या बातम्या

Cashew Processing : काजू बोंडावर प्रक्रिया उद्योगासाठी शासन सकारात्मक

कोकणाला संलग्न चंदगड व आजरा तालुक्यातही काजूचे मोठे उत्पादन होते. येथील काजूची बोंडे अल्प प्रमाणात गोवा येथील प्रक्रिया उद्योजक खरेदी करतात. उर्वरित फळ शेतातच कुजून जाते.

Team Agrowon

चंदगड, जि. कोल्हापूर ः चंदगड, आजरा विभागात काजू बोंडावर (Cashew Processing) प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासन सहकार्य करील, असे आश्वासन राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिल्याची माहिती आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी दिली.

मंत्रालयात मंत्री देसाई यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी हे आश्वासन दिले. काजू (Cahew Liquor) बोंडापासून फेणी, वाइन आदी उपपदार्थ तयार करण्यासाठी शासनाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात परवानगी दिली आहे.

कोकणाला संलग्न चंदगड व आजरा तालुक्यातही काजूचे मोठे उत्पादन होते. येथील काजूची बोंडे अल्प प्रमाणात गोवा येथील प्रक्रिया उद्योजक खरेदी करतात. उर्वरित फळ शेतातच कुजून जाते.

त्यासाठी या विभागातही प्रक्रिया उद्योगाला परवानगी दिल्यास शेतकऱ्यांना लाभ होईल, अशी भूमिका आमदार पाटील यांनी मांडली. मंत्री देसाई यांनी यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन दिले.

योगेश कदम यांच्यासह उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त विजय सूर्यवंशी, उपसचिव युवराज अजेटराव, सहआयुक्त नितीन सावंत उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT