Crop Advice : काजू पीक सल्ला

फळांतील रस शोषून घेते. त्यामुळे पालवी किंवा मोहर सुकून जातो. मोहराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात. फळांची गळ होते.
Crop Advice
Crop AdviceAgrowon

फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर (Cashew Crop) फुलकीड आणि ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे आवश्यक पीक सल्लानुसार (Crop Advice) पिकाची काळजी घ्यावी.

काजू -

१) फुलोरा ते फळधारणा अवस्था

२) फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर फुलकीड आणि ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. ही कीड पालवी, मोहर आणि फळांतील रस शोषून घेते. त्यामुळे पालवी किंवा मोहर सुकून जातो. मोहराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात. फळांची गळ होते.

नियंत्रणासाठी -

१) मोहर फुटण्याच्या वेळी प्रोफेनोफोस (५० टक्के प्रवाही) १ मिलि आणि फळधारणेच्या वेळी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिलि किंवा असिटामिप्रीड (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. (ॲग्रेस्को शिफारस आहे).

२) काजू पिकाची फळधारणा व उत्पादन वाढविण्यासाठी स्वस्त अशा सुकविलेल्या माशांचा अर्क ५०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फुले येताना पहिली फवारणी व पहिल्या फवारणीनंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)

Crop Advice
Tur Crop Verity : तज्ज्ञांकडून तूर पिकाच्या‘बीडीएन ७१६’ वाणाची पाहणी

३) काजू बियांचे उत्पादन व बियांचे आकारमान वाढविण्यासाठी प्रति झाड ताज्या किंवा आठ दिवसांपर्यंत साठविलेल्या २५ टक्के गोमूत्राच्या ५ लिटर द्रावणाची फवारणी करावी. २५ टक्के गोमूत्राच्या १० लिटर द्रावणाची झाडाच्या बुंध्यामध्ये जिरवणी पालवी आल्यापासून ३० दिवसांच्या अंतराने ४ वेळा करावी. (ॲग्रेस्को शिफारस.)

४) फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. नवीन लागवड केलेल्या काजू कलमांना पहिली २ ते ३ वर्षे ८ दिवसांच्या अंतराने १५ लिटर पाणी प्रति कलम देण्याची व्यवस्था करावी. झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे.

विद्यापीठ प्रायोगिक निष्कर्ष

काजू पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्याकरिता १९:१९:१९ (२ टक्के) २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात पहिली फवारणी पालवीवर, दुसरी फवारणी मोहर आल्यावर आणि तिसरी फवारणी फळधारणा झाल्यावर करणे फायदेशीर ठरते असे प्रयोगात आढळले आहे,

(लेखक - ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) संपर्क - ०२३५८ - २८२३८७/ ८१४९४६७४०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com