Paddy  Agrowon
ताज्या बातम्या

Paddy : पेंढ्यांचे दर वधारल्याची शेतकऱ्यांना ‘आनंदवार्ता’

डहाणू तालुक्यात भातशेतीबरोबरच माळरानात शेतामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात उगवते.

Team Agrowon

कासा : डहाणू तालुक्यात भातशेतीबरोबरच (Paddy Farming) माळरानात शेतामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात उगवते. शेतकरी, शेतमजूर हे गवत व त्याचबरोबर भातझोडपणी (Paddy Harvesting) करून राहत असलेल्या पेंढ्यांची (पाओलीची) विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. अशात या पेंढ्यांच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याने शेतकरी सुखावला आहे. कारण शेतकऱ्यांना भातपिकासोबत पेंढ्याच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. यंदा हा दर प्रतिक्विंटल दोन हजार ते २१०० रुपये इतका आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका हा गवत-पेंढा खरेदीचे कोठार अशी ओळख आहे. तालुक्यात अनेक वर्षांपासून गवत- खरेदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. वाडा, जव्हार, पालघर, डहाणू तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी पेंढा विकण्यासाठी तालुक्यातील वखारीत आणतात. गेल्या वर्षी तालुक्यात २५ वखारी सुरू होत्या. या वर्षी त्याची संख्या कमी होऊन आठ इतकी झाली आहे. पावसाळ्यात या पेंढ्याला मोठी मागणी व योग्य भाव असल्यास वखारीमालक मुंबई, गुजरात येथील तबेल्यांमध्ये त्याची विक्री करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT