Gokul Dudh Sangh Kolhapur agrowon
ताज्या बातम्या

Gokul Dudh Sangh Kolhapur : गोकुळ दूध संघाची वार्षीक सभा होणार वादळी? शौमिका महाडिक आक्रमक तर सत्ताधाऱ्यांचही ठरलं!

sandeep Shirguppe

Kolhapur Dudh Sangh Gokul : कोल्हापूर जिल्ह्यातील 'गोकुळ' दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. १५) कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे दुपारी १ वाजता होणार आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे उद्याची गोकुळची वार्षीक सभा वादळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागच्या तीन वर्षांपूर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर विरोधक महाडिक गटाकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप करण्यात आले आहेत. याचबरोबर मागच्या काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने गोकुळचे लेखापरिक्षण करण्यासाठीचा मार्ग मोकळा करून दिला. यासह अन्य मुद्दांवरून गोकुळ संचालिका शौमिका महाडिक वारंवार आवाज उठवत आहेत. तसेच गोकुळमध्ये गैरकारभार होत असल्याचे आरोपही महाडिक यांनी केले. यावरून उद्या गोकुळच्या सभेत जोरदार खंडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे यांनीही जोरदार तयारी केल्याचे समजत आहे. चेअरमन डोंगळे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, गोकुळ'ची उलाढाल पाचशे कोटींनी वाढली आहे. आम्ही काटकसरीचा कारभार करत आहोत. उद्या शुक्रवारी (ता. १५) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत सभासदांनी विषय पत्रिकेवरील विषयाला अनुसरून विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे प्रतिपादन 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले.

'गोकुळचा कारभार चांगला सुरू आहे. संचालकांनी जे जे निर्णय घेतले आहे. ते उत्पादकांच्या फायद्याचे ठरले आहेत. दरम्यान, संघाचा कारभार सभासदांपर्यंत पोचला पाहिजे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. यासाठी विषय पत्रिकेवरील आणि आयत्यावेळी आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील.

सभा दोन ते तीन तासांहून अधिक वेळ चालली तरीही उत्तरे दिली जातील. २० लाखांपर्यंतचे दूध संकलन वाढविण्याचे आमचे आव्हान आहे. यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेबद्दलची माहिती सभेत दिली जाणार असल्याचे डोंगळे म्हणाले.

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून विरोधी गटाच्या शौमिका महाडिक या जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या होणाऱ्या वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर संपर्क सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानी व गैरकारभाराचा पाढा वाचला आणि सभासदांनी वार्षिक सभेस उपस्थित राहून याप्रश्नी जाब विचारावा, असे आवाहन केले आहे.

'गोकुळ दूध संघ राज्यातील दूध दर ठरवित होता. आता संघाची उलटी परिस्थिती आहे. सत्ताधारी कमिशनसाठी इतर राज्यातून दूध खरेदी करीत आहेत. दुधाचा आणि पशुखाद्याचा दर्जा बिघडला आहे. दूध जप्त करून संस्थांचे नुकसान केले जात आहे.

संघाचा कारभार सुधारण्यासाठी आणि संघ वाचविण्यासाठी साथ देण्यासाठी वार्षीक सभेला येण्याचे आवाहन केले. यामुळे उद्याची सभा वादळी होणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT