Shoumika Mahadik : गोकुळ दूध संघात पॅकिंग केंद्रांवरून राजकीय उकळी फुटणार, शौमिका महाडिकांचे गंभीर आरोप

Gokul Milk : शौमिका महाडिक यांच्या आरोपांमुळे पुन्हा गोकुळच्या राजकारणाला उकळी फुटण्याची शक्यता आहे.
Shoumika Mahadik
Shoumika Mahadikagrowon

Gokul Milk : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या पुण्यातील पॅकिंग केंद्राची जबाबदारी पूर्वीच्यात कंपनीला देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु एका नेत्याकडून पूर्वीच्या कंपनीला हे काम न मिळण्यासाठी पुन्हा न्यायालयीन लढा सूरू ठेवला आहे.

सतेज पाटील यांनी हा न्यायालयीन लढा गोकुळच्या पैशावर न लढता स्वखर्चाने लढावा अशी टीका गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी केला. दरम्यान महाडिक यांच्या आरोपांमुळे पुन्हा गोकुळच्या राजकारणाला उकळी फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी गोकुळच्या नेत्यांकडून दुधाच्या उत्पादनात घट झाल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केल्याची माहिती समोर आली यावर महाडिक म्हणाल्या की, गोकुळ'च्या कारभाराबाबत गेल्या दोन वर्षांपासून मी मांडलेल्या मुद्द्यांची नेत्यांनी दखल घेतली असती, तर त्यांच्यावर संचालकांची बैठक घेऊन दूध संकलन आणि विक्रीत घट झाल्याचे मान्य करण्याची वेळ आली नसती.

तसेच लेखापरीक्षणातील मुद्द्यांवर आमचा लढा सुरू आहे यावर आपण हरकत घेतली आहे. त्याची चौकशी होऊन अहवाल सादर झाला आहे. राज्यातील राजकारणाचा 'गोकुळ'च्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही. ही चौकशी सुरूच राहणार आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी दि. १९ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती महाडिक यांनी दिली.

Shoumika Mahadik
Gokul Milk : अमूल, चितळेंना जमलं पण गोकुळला का नाही? चिठ्ठीवरचा कारभार कधी बंद होणार

लेखापरीक्षण अहवाल न्यायालयात आहे. याचा लवकरच निकाल लागेल. ८०० दूध संस्था वाढूनही दूध संकलनात घट कशी झाली असेही त्या म्हणाल्या.

याचबरोबर मुंबईमधील दूधविक्री वितरण व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पुण्यातही हीच परिस्थिती झाल्यास गोकुळला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांच्या हट्टासाठी आणि इर्षेसाठी पुण्यातील पॅकिंग केंद्र बदलले जात आहे.

Shoumika Mahadik
Gokul Dudh Kolhapur : 'गोकुळचे दूध संकलन का वाढत नाही', नेत्यांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

पुण्यात ३५ वर्षं काम केलेल्या वितरकांना हटवून तेथे पै-पाहुणे घातले आहेत. नव्या लोकांचा संपर्क नसल्याने वितरण व्यवस्था ढासळेल. याविरोधात काही वितरक न्यायालयात गेले. वितरकांना काम करू द्यावे. करार झाल्याशिवाय वितरक, पॅकिंग सेंटरवाल्यांना हटवू नये, असे न्यायालयाने सांगितले. मात्र, त्यांनी नियम पायदळी तुडवल्याची टीका महाडिक यांनी केली.

गोकुळच्या अधिकाऱ्यांची डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये बैठक घेतली जाते. संचालक, अधिकारी गोकुळची कागदपत्रे घेऊन खासगी ठिकाणी जातात. पण, डी. वाय. पाटील ग्रुपने अजून गोकुळ विकत घेतलेला नाही, असाही टोला महाडिक यांनी लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com