Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा भरण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्या

Crop Insurance Scheme : खरीप हंगामातील पीकविमा भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.

Team Agrowon

Nashik News : खरीप हंगामातील पीकविमा भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यानंतर अधिक रक्कम आकारणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने पावले उचलली. अखेरच्या टप्प्यात ही जनजागृती झाल्यानंतर पीकविमा भरण्याच्या प्रक्रियेस गती आली.

मात्र नंतर अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान पीकविम्याचे सर्व्हर डाऊन, ऑनलाइन सातबारा न निघणे आदी कारणांमुळे शेतकरी वंचित राहिल्याने ओरड होत आहे. त्यामुळे पीकविमा भरण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवावी, अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव यांनी केली.

यासंबंधी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, १ रुपयात पीकविमा देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला. त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होताना दिसत आहे.

परंतु ज्या ठिकाणी उशिराने पाऊस होत आहेत, तिथे आजही पेरण्या होत आहेत. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, या करिता पीकविम्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी आहे.

मागणी मान्य; मात्र स्पष्टता नाही

राज्यात अनेक ठिकाणी अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यातच पीकविमा संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करता आले नाहीत. त्यामुळे पीकविमा भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

त्यावर त्यांनी १५ दिवस मुदतवाढ देण्याची मागणी तूर्तास मान्य केली आहे, असे धनंजय जाधव यांनी सांगितले. मात्र तशी घोषणा तसेच शासन निर्णय झाला नसल्याने त्यात अद्याप स्पष्टता नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Donald Trump Tarrif Decision: डोनाल्ड ट्रम्पचा भारताला जोरदार झटका; सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क लावणार

PM Kisan: किसान सन्मान नव्हे, अपमान योजना; पंजाबराव पाटील

Crop Insurance: चंद्रपुरात पीकविम्याला कमी प्रतिसाद

River Linking Project: सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध

Anjangaon Surji APMC: अंजनगावसूर्जी बाजार समिती सभापती, प्रभारी सचिवावर गुन्हा

SCROLL FOR NEXT