Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टीबाधितांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या

परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या

टीम ॲग्रोवन

परभणी: पंचनामे न करता जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित (Heavy Rainfall) शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा (Crop Insurance) भरपाई द्यावी. तसेच अतिवृष्टीची हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghtna) कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला.

जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १४) ढगफुटी झाली. सततच्या पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांचे नुकसान झाले आहे.

जून महिन्यापासून कधी जास्त पावसाने तर कधी एक महिना खंड दिलेल्या पावसाने जिल्ह्यातील खरिपाचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागे उभे राहायला पाहिजे होते.

परंतु महसुल, कृषी विभागाने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यांचे कोणतेही कर्मचारी ना गाव पातळीवर जातात ना वस्तुनिष्ठ अहवाल प्रशासनास सादर करतात. केवळ आठ मंडळांचीच अग्रीमसाठी निवड करण्यात आली.

संपूर्ण जिल्ह्यात पीकविमा मंजूर करावा. पंचनामे करण्यातच वेळ घालू नये या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT