Cotton Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Market: खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड सुरू

यंदा सुमारे २५ लाख गाठींची निर्मिती खानदेशातील जिनींग प्रेसिंग कारखान्यांत होईल, असे दिसत आहे. खानदेशात सुमारे १५३ जिनिंग प्रेसिंग मिल्स आहेत. या मिल्सच्या यंत्राची चाके फेब्रुवारी २०२१ पासून बंद झाली होती.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः नव्या हंगामात कापसाची आवक सुरू झाली आहे. जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची चाके फिरू लागली आहेत. खानदेशात धुळे, शिरपूर, शहादा, जळगावमधील जामनेर, बोदवड, पारोळा, एरंडोल, धरणगाव या ठिकाणी जिनिंग मिल्स सुरू झाल्या आहेत. यंदा सुमारे २५ लाख गाठींची निर्मिती खानदेशातील जिनींग प्रेसिंग कारखान्यांत होईल, असे दिसत आहे.

खानदेशात सुमारे १५३ जिनिंग प्रेसिंग मिल्स आहेत. या मिल्सच्या यंत्राची चाके फेब्रुवारी २०२१ पासून बंद झाली होती. कापसाची आवक विजयादशमीपासून सुरू झाली. जिनिंग सुरू करण्याइतपत कापूस आल्याने त्या चालकांनी सुरू केल्या आहेत. सुमारे ३० कारखाने सुरू झाले आहेत.

खरीप हंगाम २०२१ मध्ये अतिवृष्टीने हातातील कापूस वाया गेला होता. अत्यल्प कापसाने केवळ चार महिने जिनिंग प्रेसिंगचा हंगाम सुरू होता. कापसाअभावी फेब्रुवारीपासून जिनिंग बंद करण्याची वेळ जिनिंगचालकांवर आली होती. यामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा जिनिंगचालकांना सहन करावा लागला होता.

यंदा आतापर्यंत १०७ टक्के पाऊस झाला आहे. काही ठिकाणी पावसाने कापसाचे नुकसान झाले आहे. मात्र इतर ठिकाणी कापूस पिकांची चांगली स्थिती आहे. अनेक ठिकाणी कापसाचे उत्पादन हाती आले आहे. आगामी काळातही कापसाची टंचाई नसेल. गेल्या वर्षी १३ हजारांपर्यंत प्रतिक्विंटलला मिळालेला दर पाहता, यंदा कापसाचा पेरा ११० टक्के झाला आहे. कापूस पिकावर सध्यातरी कोणत्याही प्रकारचा रोग नाही (बोंड अळी वगैरे), आतापर्यंत जो कापूस आलेला आहे, त्याचा दर्जा उत्तम आहे. याचा परिणाम चांगल्या प्रकारचा, मोठ्या प्रमाणात कापूस बाजारात येणार आहे.

जून-जुलैपर्यंत कारखाने राहतील सुरू
दर वर्षी १५ ते १६ लाख गाठी जिल्ह्यात तयार होतात. गेल्या वर्षी कापसाअभावी केवळ नऊ लाख गाठींची निर्मिती झाली होती. यंदा मात्र कापसाचे उत्पादन अधिक असल्याने २५ लाख गाठींची निर्मिती करता येईल. जिनिंग प्रेसिंग यंत्रेही जून-जुलैपर्यंत सुरू राहू शकतील. अनेकांना त्यातून रोजगार मिळेल.

कापसाची आवक सुरू झाली आहे. यामुळे २५ टक्के जिनिंग सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात जिनिंग प्रेसिंग मिलही कापूस घेऊन गाठी बनविण्यासाठी सज्ज आहेत. आगामी काळात कापूस बाजारपेठेत कशा प्रमाणात येतो, त्या प्रमाणात गाठी तयार होतील.
प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT