Honey Village Agrowon
ताज्या बातम्या

Honey village : चिकूनंतर घोलवडची आता मधाचे गाव म्हणून ओळख

Honey producer village : पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये फळ आणि फुल बागायतदार शेतकरी मधमाशी पालनाकडे पर्यायी व्यवसाय म्हणून बघतात. मात्र त्यातही नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या मधमाशी पालनाला अधिक मागणी आहे.

Team Agrowon

Palghar News : खादी ग्रामोद्योग पालघर विभागाने घोलवडला मधाचे गाव म्हणून मंजुरी देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने चिकूनंतर आता घोलवडची ओळख मधाचे गाव म्हणून होणार आहे.

घोलवड गावात अनेक विकासाची कामे सुरू झाली असून या भागात असलेल्या शेती-बागायतीचा नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी उपयोग करण्यात यावा म्हणून खादी ग्रामोद्योग विभागाने घोलवड गावाला ‘मधाचे’ गाव म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व ग्रामस्थ, शेतकरी आणि बागायतदारांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच रवींद्र बुजड यांनी केले आहे.

जिल्हा परिषद खादी ग्रामोद्योग विभागाच्या अधिकारी अंजना गायकवाड, सचिव आनंद चौधरी यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. पालघर जिल्हाधिकारी बोडके यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे सरपंच बुजड व उपसरपंच कुणाल शहा यांनी स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT