Mahad Flood Agrowon
ताज्या बातम्या

Mahad Flood Update : महाडमध्ये काळ, गांधारी, सावित्री नदीला पूर

Savitri River Flood : तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील काळ, गांधारी व सावित्री नदीला पूर आल्याने महाड व परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे.

Team Agrowon

Mahad News : तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील काळ, गांधारी व सावित्री नदीला पूर आल्याने महाड व परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. महाड नगरपालिका व जिल्‍हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून बचाव पथक सज्ज आहे.

गेल्‍या २४ तासांत महाड तालुक्यात १९० मिलिमीटर तर पोलादपूर तालुक्यात २२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये पडणारे पाणी सावित्री नदीमार्गे महाडमध्ये येत असल्याने शहराला पुराचा फटका बसत आहे. रायगड भागातून येणारी काळ व गांधारी या नद्याही मंगळवारपासून दुथडी भरून वाहू लागल्याने महाड शहरांमध्ये बुधवारी सकाळपासून पुराचे पाणी शिरू लागले.

दस्तुरी नाका ते नातेखिंड हा रायगड किल्‍ल्‍याकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला. भीमनगर, दस्तुरी नाका, गांधारी नाका या भागामध्ये गांधारी नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी सामान हलवण्यास सुरुवात केली. सावित्री नदीतील पाणी भोईघाटामार्गे महाड शहरात शिरू लागले आहे.

सावित्रीची पातळी दुपारी दोन वाजेपर्यंत साडेसात मीटरपर्यंत गेल्याने शहरातील बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. महाड शहरातील सुकट गल्लीत आधी पाणी शिरल्‍यानंतर महात्मा गांधी मार्गावर, बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाली.

२०२१ मध्ये पुराचे पाणी शिरल्याने महाडकारांचे अतोनात नुकसान झाले होते. आता पुन्हा शहरात पाणी शिरू लागल्याने महाडकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील डोंगरेपूल, भाजी मंडई परिसरात पाणी भरले. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच सामान सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू होती. नगरपालिकेकडून बचाव कार्य व बचाव गट स्थापन करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक व्हाॅट्सअॅपद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत.

आंबेनळी घाटात दरड कोसळली

सावित्री नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्‍याने शहरातील अनेक रस्‍ते पाण्याखाली गेले. तालुक्यातील माटवन-सवाद या विभागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. गोपाळवाडी गावात रस्त्यावर दरड कोसळल्‍याची घटना घडली आहे. गांधारी पूल, दस्तुरी नाका भागात पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

अनेकांनी आपली वाहने गोवा महामार्गालगत उभी केल्‍याने सुमारे पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्‍या होत्‍या. पाणी साचलेल्या ठिकाणी, पुलावर फलक सूचना फलक लावून मार्ग बंद करण्यात आले आहेत. आंबेनळ घाटात दरड कोसळल्‍याने वाहतूक ठप्प झाली होती.

शहराप्रमाणेच तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. आपत्‍कालीन परिस्‍थितीचा सामना करण्यासाठी महाडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात आहे. आवश्यकता वाटल्यास सुरक्षित स्थळी नागरिकांचे स्थलांतर केले जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT