Nitin Gadkari Agrowon
ताज्या बातम्या

Nitin Gadkari : ‘सिट्रस काँग्रेस’च्या संकेतस्थळाचे गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

Citrus Congress : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने २८ ते ३० ऑक्‍टोबर या कालावधीत ‘एशियन सिट्रस काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nagpur News : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या वतीने २८ ते ३० ऑक्‍टोबर या कालावधीत ‘एशियन सिट्रस काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची व्यापक प्रसिद्धी, नोंदणी तसेच ऑनलाइन शोध निबंधांचा गोषवारा सादर करण्यासाठी तयार केलेल्या विशेष संकेतस्थळाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २२) करण्यात आले.

लिंबूवर्गीय फळपिकासंदर्भाने होणाऱ्या या आयोजनाबद्दल गडकरी यांनी आनंद व्यक्‍त केला तसेच शुभेच्छाही दिल्या.

‘‘लिंबूवर्गीय फळपिकातील संशोधनाची दशा आणि दिशा कळावी, त्यावर मंथन व्हावे, या उद्देशाने ‘एशियन सिट्रस काँग्रेस’ आयोजित करण्यात आली आहे.

इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, एशिया-पॅसिफिक असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, थायलंड आणि कोरियन सोसायटी फॉर सिट्रस ॲण्ड सबट्रोपिकल क्‍लायमेट फ्रूट्‍स, दक्षिण कोरिया यांच्या संयुक्‍त सहकार्याने हे आयोजन केले आहे.

जगभरातील लिंबूवर्गीय फळ संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांची त्यात उपस्थिती राहील,’’ अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी दिली. संत्रा उत्पादक तसेच या क्षेत्रातील भागधारकांना त्यांचे अनुभव कथन करण्याची संधी देखील या व्यासपीठावर मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT