Ajit Pawar News Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे विविध विकास कामांचे उद्घाटन विरोधी पक्षनेते पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

टीम ॲग्रोवन

मोरगाव, जि. पुणे ः ‘‘राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) अडचणीत असताना अद्याप मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet) अस्तित्वात आले नाही. नवे सरकार विकास कामांना स्थगिती (Stay On Development Work) देत आहे,’’ अशी खंत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोरगाव (ता.बारामती) येथे व्यक्त केली.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे विविध विकास कामांचे उद्घाटन विरोधी पक्षनेते पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष नंदकुमार होळकर, मोरगावचे सरपंच नीलेश केदारी, उपसरपंच संतोष नेवसे, माजी सरपंच पोपट तावरे, किरण गुजर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, भरत खैरे, हनुमंत भापकर, दत्तात्रेय ढोले, मुरलीधर ठोंबरे, भाऊसाहेब कांबळे, अमृता गारडे आदी मान्यवर उपस्थित होते. येथील अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण, जलशुद्धीकरण केंद्र आदी विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले.

पवार म्हणाले, ‘‘सध्याचे सरकार हे केवळ दोघांचे आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे अडचणी असताना ठोस निर्णय घेतला जात नाही. याबाबत राज्यपालांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या सरकारने विकास कामांना खीळ घातली असली तरी पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपस्थितांना दिले.

अष्टविनायकांपैकी पाच मंदिर पुणे जिल्ह्यात आहेत. मोरगावचे मंदिर अष्टविनायकातील प्रथम तीर्थक्षेत्र असल्याने त्याचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. येथे दिवसेंदिवस येणाऱ्या भक्तांची पर्यटकांची संख्या लक्षात घेता नव्याने मोरगावचा विकास आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. विकास कामे करताना नाराजी व अडचणी येत असतात,’’ असेही ते म्हणाले. या वेळी सरपंच नीलेश केदारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून केलेल्या विकास कामांचे कौतुक पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ कदम यांनी केले.

‘पुरंदर उपसा सिंचन योजना ही संजीवनी’

बारामती, पुरंदर व दौंड तालुक्यांतील शेतकऱ्यांना पुरंदर उपसा सिंचन योजना ही संजीवनी ठरत आहे. यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामार्फत बारामती तालुक्यासाठी ही योजना चालवण्याची तयारी अजित पवार यांनी दर्शविली असून एक महिन्यात त्या संदर्भात कामाचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT