Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : फळपीक विमा जनजागृती चित्ररथ सिंधुदुर्गमध्ये

फळपीक विम्याबाबत जनजागृतीकरिता जिल्ह्यात चित्ररथ दाखल झाला आहे.

Team Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विम्याबाबत (Crop Insurance) जनजागृतीकरिता जिल्ह्यात चित्ररथ दाखल झाला आहे. हा रथ जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांमध्ये फळपिकांचे क्षेत्र संरक्षित करण्याविषयी जागृती करणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत विमा उतरविण्यासाठी मुदत आहे.

रब्बी हंगामात जिल्ह्यात प्रमुख आंबा, काजू पिकांसह केळीचा फळपीक विमा योजनेत समावेश आहे. जिल्ह्यात आंबा, काजू पिकांखाली असलेले क्षेत्र आणि प्रत्यक्षात विमा संरक्षित केले जाणारे क्षेत्र यामध्ये मोठी तफावत आहे. गेल्या काही वर्षांत फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढला असला तरी अद्याप अपेक्षित शेतकरी विमा उतरवित नाहीत. मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, तापमान वाढ, ढगाळ वातावरण यामुळे सातत्याने पिकांचे नुकसान होते.

त्यामुळे अधिकाधिक बागायतदारांनी फळपीक योजनेचा लाभ घ्यावा या हेतुने विमा कंपनीने जागृती करण्यासाठी चित्ररथ तयार केला असून तो गावागावात जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. या चित्ररथाला झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्रीधर पाटील यांनी जागृती मोहिमेचा प्रारंभ केला.

या वेळी जिल्हा कृषी कार्यालयाचे अरुण नातू, सिद्धेश येडवे, कृषी पर्यवेक्षक संभाजी घाडी, स्वामिनी परब, जीवन राणे आदी उपस्थित होते. आंबा, काजूसह केळी पीक क्षेत्र संरक्षित करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT