snake bite  Agrowon
ताज्या बातम्या

Snake Bite : पुणे जिल्ह्यात महिनाभरात चार सर्पमित्रांना सापाचा दंश

Snake Bite Death : जिल्ह्यात महिनाभरात चार सर्पमित्रांना सर्पदंश झाला आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना जीवनदान मिळाले आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे : जिल्ह्यात महिनाभरात चार सर्पमित्रांना सर्पदंश झाला आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना जीवनदान मिळाले आहे. बारामती येथील सर्पमित्र विजय यादव यांना १५ ऑगस्ट रोजी नागाने दंश केला.

त्यानंतर उपचारादरम्यान चार दिवसांत यादव यांचा मृत्यू झाला. त्याच दरम्यान मोशी येथील सर्पमित्र नितीन शेलकर याला नागाचा दंश झाला. मात्र त्यांच्यावर उपचार होऊन तो पूर्णपणे बरा झाला. ही घटना ताजी असतानाच पुणे जिल्हा वन्यजीव सर्परक्षक असोसिएशनचे शहराध्यक्ष विनायक मुगडे यांनाही नागाचा दंश होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे सर्पमित्र गणेश टिळेकर हे शिक्रापूर येथे अतिविषारी घोणस पकडत असताना त्याने टिळेकर यांना दंश केला. त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दंश झालेले चारही सर्पमित्र कोणतीही सुरक्षितता न बाळगता साप पकडण्याचे काम करीत होते.

सापाबाबत जनजागृतीची गरज :

सर्प अभ्यासक नीलिमकुमार खैरे म्हणाले, ‘‘साप पकडण्यासाठी जाताना शक्यतो एकट्याने जाऊ नये. तसेच साप पकडण्यासाठी स्टिकचा वापर करावा. पकडलेल्या सापाबाबत जनजागृती करावी. साप पकडल्यानंतर तो लोकांना दाखविण्याचा स्टंट करू नये. विशेषतः साप पकडताना तोंडात गुटखा, नशापाणी केलेले नसावे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT