Kolhapur News: जागतिक बाजारात साखरेच्या दरांवर दबाव कायम असतानाही ब्राझीलने निर्यातीचा वेग वाढवत यंदाच्या साखर हंगामात विक्रमी आघाडी घेतली आहे. वाढलेली शिपमेंट, स्पर्धात्मक दर आणि सातत्यपूर्ण परदेशी मागणी यामुळे ब्राझीलचा साखर उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम स्थितीत असल्याचे स्पष्ट होत आहे..ब्राझीलच्या विकास, उद्योग, व्यापार आणि सेवा मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार सचिवालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या दहा कामकाजाच्या दिवसांत दररोज सरासरी १,३१,३८४ टन साखर निर्यात झाली. फेब्रुवारी २०२५ मधील त्याच कालावधीत ही सरासरी ९१,२५७ टन होती. म्हणजेच निर्यातीच्या सरासरीत तब्बल ४४ टक्क्यांची वाढ झाली आहे..Sugar Industry: साखर उद्योगाच्या हिताच्या मात्रा.या दहा दिवसांत साखर आणि मोलॅसेसची एकूण निर्यात १३,१३,८४७ टनांवर पोहोचली. ही वाढ केवळ तात्पुरती नसून दीर्घकालीन प्रवाहाचा भाग असल्याचे संकेत आहेत. २०२५ या संपूर्ण वर्षात ब्राझीलने ३१ दशलक्ष टनांपेक्षा अधिक साखर निर्यात केली होती. त्यामुळे जागतिक साखर व्यापारात ब्राझीलचे वर्चस्व कायम असल्याचे दिसते..दरात घट, पण महसुलात वाढजागतिक बाजारात पुरवठा वाढल्याने आणि काही प्रमुख आयातदार देशांतील मागणीत चढ-उतार झाल्याने साखरेच्या दरात घसरण झाली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रति टन सरासरी दर ४७७.८ डॉलर्स होता. तो फेब्रुवारी २०२६ मध्ये ३७० डॉलर्सवर आला आहे. म्हणजेच दरात २२.६ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, निर्यातीचे प्रमाण लक्षणीय वाढल्याने महसुलावर सकारात्मक परिणाम झाला आहे. .Maharashtra Sugar Factory: कारखाने आता वर्षभर चालणार.सरासरी दैनंदिन निर्यात महसूल ४३.६०७ दशलक्ष डॉलर्सवरून ४८.६२४ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढला आहे, म्हणजेच ११.५ टक्क्यांची वाढ झाली. फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या दहा कामकाजाच्या दिवसांत एकूण निर्यात उत्पन्न ४८६.२३८ दशलक्ष डॉलर्स इतके झाले आहे. तुलनेत, फेब्रुवारी २०२५ या संपूर्ण महिन्याचा महसूल ८७२.१४६ दशलक्ष डॉलर्स होता. यावरून स्पष्ट होते की, दर कमी असतानाही वाढीव शिपमेंटमुळे महसूल स्थिर राखण्यात ब्राझील यशस्वी ठरला आहे..फायदेशीर हंगामामागील कारणेब्राझीलमध्ये उसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने साखर उत्पादन सातत्याने वाढते आहे. सजागतिक दर घसरले असले तरी ब्राझीलचा उत्पादन खर्च तुलनेने कमी असल्याने निर्यात स्पर्धात्मक राहते.आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्व देशांकडून साखरेला सातत्याने मागणी आहे. तसेच, ब्राझीलियन चलनातील बदलामुळे निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात फायदा मिळतो..ब्राझीलच्या तुलनेत भारतजागतिक बाजारात भारताची उपस्थिती नावापुरती आहे. दहा लाख टन साखरेस परवानगी असली तरी दरामुळे तीन लाखांपेक्षा अधिक साखर निर्यात झाली नाही. दर परवडत नसल्याने यंदाच्या हंगामात केंद्राने साखर निर्यातीचे दिलेले उद्दिष्ट गाठण्यात देशातील साखर कारखाने कमी पडतील अशी शक्यता आहे. नजीकच्या काळात वाहतूक खर्च कमी असलेल्या देशांनी साखर निर्यात करण्यासाठी काही कारखान्यांची धडपड असली तरी याची गती अतिशय कमी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.