Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : साडेचार लाख दावेदारांना विमा भरपाईची प्रतीक्षा

विमा कंपनीचे सरकारच्या हप्त्याकडे बोट; भरपाई निश्‍चित

Team Agrowon


ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : जिल्ह्यातील पीक नुकसानग्रस्त (Crop Damge) शेतकऱ्यांनी स्थानिक नेसर्गिक आपत्ती घटकांतर्गत पीकविमा (Crop Insurance) कंपनीकडे साडेचार लाखांवर वैयक्तिक दावे दाखल केले आहेत. याबाबत विमा कंपनीने पंचनामे करून नुकसानीनुसार भरपाई निश्‍चित केल्याचे बोलले जात आहे. परंतु केंद्र व राज्य शासनाकडून विमा कंपनीला अदा करण्यात येणारा हप्ता मिळालेला नाही. दावेदार शेतकरी मात्र विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

नांदेड जिल्ह्यात पावसाळ्याच्या पाच महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे अनेक मंडलांत एकापेक्षा अधिकवेळा अतिवृष्टी नोंदली गेली. नदी-नाल्यांना पूर आला. यात नदीकाठची पिके खरडून गेली. तर काही ठिकाणी पाणी साचून पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीत जिल्ह्यातील सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या सव्वापाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने शासनाकडे पाठविली होती. या बाबत शेतकऱ्यांना ७१७.८८ कोटींची भरपाई मंजूर झाल्याने त्या निधीच्या वाटपाचे काम सुरू आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे वैयक्तिक दावे दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले होते. यामुळे जिल्ह्यातून पोर्टलवर तीन लाख ७० हजार ४७८, ई-मेलद्वारे ३७ हजार ५८, तर टोल फ्री क्रमांकावरून ३८ हजार २२३, ऑफलाइन २७६, तर इतर ११ हजार ९९४ असे एकूण चार लाख ५८ हजार २९ दावे दाखल झाले. अर्ज आलेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.


२५ टक्के अग्रीम रक्कम वजा होणार
शेतकऱ्यांना दावे दाखल केल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक नुकसानीनुसार विमा भरपाई मिळणार आहे. या बाबत आकडेवारीही निश्‍चित झाल्याचे कळाले, परंतु शेतकऱ्यांना परतावा मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. हा हप्ता कंपनीला मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती कंपनीच्या सूत्राने दिली. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकूण रकमेतून यापूर्वी मिळालेली २५ टक्के अग्रीम रक्कम वजा करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे मत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT