Banana Crop Insurance : केळी उत्पादकांना भरपाईची प्रतीक्षा

Team Agrowon

जळगाव आणि अकोला जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये फळ पीकविमा योजनेत (Fruit Crop Insurance) सहभागी झालेल्या केळी उत्पादकांना (Banana Growers) अद्यापही वादळ, गारपिटीत नुकसानीसंबंधीची भरपाई (Crop Damage Compensation) मिळाली नसल्याची स्थिती आहे.

यामुळे केळी उत्पादकांत शासनाबाबत नाराजी वाढली आहे.

जिल्ह्यातील ४९ हजार केळी उत्पादक हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२१-२२ मध्ये सहभागी झाले होते.

५३ हजार हेक्टरवरील केळी पिकासाठी या शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते.

नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांसाठी केळी पिकाला थंडी, अधिक तापमान, वादळ (वेगाचा वारा), गारपीट या हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळते.

विमा संरक्षण कालावधीत रावेर, यावल, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, पाचोरा या तालुक्यांत वादळ व गारपीट झाली.

यासंबंधी सूचना दिल्यानंतर पंचनामे झाले. विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर २१ दिवसांत परतावे देण्याचे या योजनेत निर्देशित आहे.

शासन व विमा कंपनीने थंडी व उष्णता यात नुकसानीसंबंधी परतावे वेळेत दिले.

परंतु संरक्षण कालावधी संपून दोन महिने झाले तरीही केळी उत्पादकांना भरपाई मिळालेली नाही.

cta image