Sambhaji Raje  Agrowon
ताज्या बातम्या

Fort Conservation : गड-किल्ल्यांचे संवर्धन करणार ः संभाजीराजे

किल्ले रायगडाचे राज्य शासनाने शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केले आहे. मात्र छत्रपती शिवरायांच्या राज्यातील असंख्य गड-किल्ल्यांची देखभाल- दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नगर ः ‘‘किल्ले रायगडाचे राज्य शासनाने शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन (Fort Conservation) केले आहे. मात्र छत्रपती शिवरायांच्या राज्यातील असंख्य गड-किल्ल्यांची देखभाल- दुरुस्तीअभावी (Fort Maintenance) दुरवस्था झाली आहे. त्यापैकी ३० कड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम गड-किल्ले फेडरेशनने हाती घेतले आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या शहागडाचा समावेश केला आहे,’’ अशी माहिती छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे राष्ट्रीय छावा संघटनेच्या मेळाव्यानिमित्त आले असताना संभाजीराजे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘शहाजीराजे व राजमाता जिजाऊंचा पदस्पर्श लाभलेल्या पेमगिरीच्या शहागडाच्या दर्शनाने वेगळी अनुभूती मिळाली. या गडाचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन होण्याची आवश्यकता आहे. शिवरायांचे स्मारक किंवा गड-किल्ले खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.’’

‘‘राज्य सरकारने रायगडाचे संवर्धन शास्त्रोक्त पद्धतीने केले, त्याप्रमाणे इतर गड-किल्ल्यांचे संवर्धन का होत नाही, असा सवाल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.’’ दुरवस्था झालेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी काही अडचण येत असल्यास तेही सांगा. आम्हाला तुमच्याकडून आर्थिक मदतीची गरज नाही. फेडरेशनतर्फे राज्यातील ३० गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. आम्ही वर्षभर सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन करू,’’ असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारची उदासीन भूमिकेवर नाराजी

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात जिंकलेल्या व उभारलेल्या गड-किल्ल्यांचा ताबा सध्या राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाकडे आहे. मात्र त्या किल्ल्यांची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेवर संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Farmers Market : शेतकरी बाजाराचा मुद्दा मागे पडला

Banana Procurement : कमी दरात केळीच्या खरेदीचा धडाका

Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्दचा शेतकरी आणि नागरिकांना काय फायदा मिळणार ?

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

SCROLL FOR NEXT