Forest Department Agrowon
ताज्या बातम्या

Forest Department : वनकर्मचाऱ्यांनी सुरक्षित साधनांचा वापर करावा ः डुंबरे

Latest Agriculture News : जुन्नर वनविभागाच्या आपत्कालीन पथकाला मधमाशीविषयी एक दिवसाचे प्रशिक्षण वर्गात प्रा. डुंबरे बोलत होते. प्रशिक्षणात वनविभागाच्या जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, शिरूर तालुका वनपरीक्षेत्रातील आपत्कालीन पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

Team Agrowon

Pune News : मधमाश्‍यांच्या हल्ल्यांच्या घटनेत पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी सुरक्षित साधनांचा वापर करावा, असे आवाहन केंद्रीय मधमाशी संशोधन परिषदेचे मुख्य प्रशिक्षक प्रा. हेमंतकुमार डुंबरे यांनी केले.

जुन्नर वनविभागाच्या आपत्कालीन पथकाला मधमाशीविषयी एक दिवसाचे प्रशिक्षण वर्गात प्रा. डुंबरे बोलत होते. प्रशिक्षणात वनविभागाच्या जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर, शिरूर तालुका वनपरीक्षेत्रातील आपत्कालीन पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

जुन्नर वनविभागातील पर्यटनस्थळी अनेक वेळा पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्यात पर्यटक जखमी झाल्याचा घटना घडल्या आहेत. अशा प्रसंगी आपत्कालीन मदतीसाठी वनकर्मचाऱ्यांना तातडीने धाव घ्यावी लागते. पर्यटकांची काळजी व सुरक्षिततेच्या हेतूने प्रशिक्षण वर्ग आयोजित केला असल्याचे प्रभारी उपवनसंरक्षक अमित भिसे यांनी सांगितले.

प्रा. डुंबरे यांनी मधमाशी संवर्धन व पालनाबरोबरच मधमाशीपासून सुरक्षित उपायाबाबत मार्गदर्शन केले. सुरक्षित साधनांचा वापर करवा याचे प्रात्यक्षिक सादर केले. मधमाशीपालनांपासून आर्थिक गरज पूर्ण करण्याबरोबर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हातभार कसा लावला जातो याबाबत माहिती दिली.

...ही घ्या काळजी

पर्यटकांनी गड, किल्ले, गुहा, जंगल आदी ठिकाणी जाताना भडक रंगांचे कपडे घालू नयेत. मोठ्या आवाजात गाणी लावून नाचू नये. निसर्गातील मधमाश्‍यांच्या वसाहतींना दगड किंवा काठी, इतर काहीही फेकून मारू नये.

पोळ्यांचे फोटो काढताना फ्लॅशचा वापर करू नये आदी सूचना डुंबरे यांनी या वेळी केल्या. या मार्गदर्शन प्रशिक्षणास सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, वनपरीक्षेत्रअधिकारी प्रदीप चव्हाण, प्रशिक्षणार्थी वनपरीक्षेत्र अधिकारी उगले, बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी महेंद्र ढोरे व वनकर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Project Authority: जलसंधारण कामांच्या मान्यतेचे अधिकार ‘कृषी’कडून काढले

NBPGR and Agricultural University MOU : वनामकृवि, ‘राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संसाधने’ यांच्यात करार

Caste Certificate Deadline: जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिने मुदतवाढ

Onion Payment Delay: ‘एनसीसीएफ,’ ‘नाफेड’कडून मिळेनात कांद्याचे पैसे

River Pollution: नद्या प्रदूषणमुक्तीसाठी पाण्यावर प्रक्रिया करू

SCROLL FOR NEXT