Raju Shetty Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetty : एकरकमी ‘एफआरपी’साठी प्रसंगी रक्त सांडू : राजू शेट्टी

ऊस वजनात किमान १० टक्के काटामारी साखर कारखान्यांकडून सुरू असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून ‘जागर एफआरपी’चा संघर्ष ऊसदराचा’ या यात्रेची सुरुवात झाली.

टीम ॲग्रोवन

जि. सांगली : एकरकमी एफआरपीसाठी (FRP)प्रसंगी रक्त सांडू, पण मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिला. ऊस वजनात (Sugarcane Crop) किमान १० टक्के काटामारी साखर कारखान्यांकडून (Sugar Mill) सुरू असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथून ‘जागर एफआरपी’चा संघर्ष ऊसदराचा’ या यात्रेची सुरुवात झाली. या वेळी जाहीर सभेत शेट्टी बोलत होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू भाई सुभाष पाटील अध्यक्षस्थानी होते.

या वेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, भागवत जाधव, संदीप राजोबा, पोपट मोरे, तानाजी साठे,

जगन्नाथ भोसले, अप्पासाहेब पाटील, राम पाटील, प्रकाश देसाई, संजय बेले, आनंदराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रदीप पाटील, रवींद्र कुलकर्णी, पाणीपुरवठा संस्थाचे अध्यक्ष मानसिंगराव पाटील,

तालुकाध्यक्ष जगन्नाथ भोसले, पंजाबराव कदम, हणमंत पाटील, विश्वजीत पाटील, प्रतीक पाटील, अक्षय पाटील, सुभाष दबडे, योगेश विभुते, मधुकर डिसले, प्रकाश देसाई उपस्थित होते. एस. यू. संदे यांनी मनोगत व्यक्त केले.

कोल्हापुरातील शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळते. परंतु सांगलीतील शेतकऱ्यांना ऊसदर असो की, एकरकमी एफआरपी ती मिळू नये यासाठी वाळवे तालुक्यातच पाणी मुरतंय, अशी टीका आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता वक्त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT