Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : तापमानात चढ-उतार सुरू

राज्यात उन्हाचा चटक्यामुळे कमाल तापमानात वाढ कायम आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात थंडी असली तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे.

Team Agrowon

Latest Weather Update पुणे : राज्यात उन्हाचा (Heat) चटक्यामुळे कमाल तापमानात (Temperature) वाढ कायम आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात थंडी (Cold) असली तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे.

सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कमाल तापमानात वाढ झाल्याने यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढल्या. शनिवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे फेब्रुवारी महिन्याचे गेल्या दहा वर्षांतील उच्चांकी रत्नागिरी ३९.४ तापमान नोंदले गेले.

सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकणातील सांताक्रूझ, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, विदर्भात ब्रह्मपुरी आणि वर्धा येथे पारा ३६ अंशांच्या वर होता.

दुसरीकडे पहाटेच्या वेळी गारठाही कायम असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. निफाड येथे हुडहुडी कायम आहे.

तर पुणे, जळगाव वगळता उर्वरित राज्यात बहुतांशी भागात किमान तापमान १३ अंशांच्या पुढे गेले आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवार (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.७ (१०.५), जळगाव ३५.८ (१०.३), धुळे ३५.०(१३), कोल्हापूर ३४.३ (१९.७), महाबळेश्वर २९.६ (१६), नाशिक ३४.२ (११.७), निफाड ३४.१(८.२),

सांगली ३५.३ (१७.६), सातारा ३४.२ (१४.३), सोलापूर ३६.४ (१७.४), सांताक्रूझ ३६.५ (२१), डहाणू ३२.३ (१८.२), रत्नागिरी ३५.१ (२१), औरंगाबाद ३४ (१२.२), नांदेड - (१६.८), परभणी ३४.४(१४.७), अकोला ३६.८ (१५),

अमरावती ३५.४(१६), बुलडाणा ३२.६(१७.४), ब्रह्मपुरी ३६ (१५.८), चंद्रपूर ३४ (१७.४), गडचिरोली ३२.८(१४.२), गोंदिया ३३.५ (१३.८), नागपूर ३५ (१५.१), वर्धा ३६ (१६.६), वाशीम - (१५.२), यवतमाळ ३४.२ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharshtra Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज 

Nursery Management Training: फळ रोपवाटिका व्यवस्थापनावर तीनदिवसीय प्रशिक्षण

Crop Insurance Issue: शेकटा मंडळातील पीकविमा परताव्याचा प्रश्न ऐरणीवर!

Gomutra Wapar: गोमूत्र वाया जाऊ देऊ नका; शेणखताची गुणवत्ता वाढवण्यासाठी करा वापर

Ratoon Sugarcane Management: कमी पाण्यामध्ये खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT