Weather Udpate Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : किमान तापमानात चढ-उतार शक्य

पावसाला पोषक हवामान व ढगाळ आकाशामुळे किमान तापमानात वाढ होत थंडी कमी झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाली आहे.

Team Agrowon

पुणे : पावसाला पोषक हवामान व ढगाळ आकाशामुळे (Cloudy Weather) किमान तापमानात वाढ होत थंडी (Cold Weather) कमी झाली आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका (Heat) आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. ३०) राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने (weather Department) वर्तविली आहे.

अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामान झाले. परिणामी किमान तापमानात चांगलीच वाढ झाली.

रविवारी (ता. २९) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी ९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान ११ ते २० अंशांच्या दरम्यान आहे.

उन्हाचा चटका कायम असून, कोकणातही कमाल तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

अग्नेय बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, या प्रणालीची तीव्रता वाढत आहे. बुधवारपर्यंत (ता. १) तीव्र कमी दाब प्रणाली श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.

उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी अधिक होत आहे. रविवारी (ता. २९) हरियाणाच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ३०) जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड पावसासह हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. तर लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये विजा, गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे.

रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.१ (१२.२), जळगाव ३१.६ (१४.५), धुळे ३२.० (१३.०), कोल्हापूर ३०.७ (१७.६), महाबळेश्वर २७.१ (१४.२), नाशिक ३१.१ (१२.६), निफाड २९.८ (९.७), सांगली ३१.७ (१६.२), सातारा ३१.९ (१२.९), सोलापूर ३४.४ (१८.३),

सांताक्रूझ ३४.५ (२२.२), डहाणू ३२.४ (२०.४), रत्नागिरी ३४.३(१९.५), औरंगाबाद ३०.४ (१०.९), नांदेड ३२.६ (१६.८), उस्मानाबाद ३२.४ (१६.८), परभणी ३१.६(१५.६), अकोला ३३.१ (१६.०), अमरावती ३२.० (१६.४),

बुलढाणा ३२.४ (१८.०), ब्रह्मपूरी ३४.० (१७.५), चंद्रपूर ३१.६ (१७.२), गडचिरोली ३१.०(१४.८), गोंदिया ३२.२(१६.०), नागपूर ३१.८ (१५.७), वर्धा ३२.२(१६.४), यवतमाळ ३१.० (१६.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT